शिंदेंच्या घरातील ‘या’ व्यक्तीला मुख्यमंत्री घाबरायचे; एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी माझ्या आईला प्रचंड घाबरायचो. आमची आई म्हणजे बाॅस होती आणि तिला सगळेच घाबरायचे. आईचा दरारा खूप होता. तिचे फटकेही मी अनेकदा खालले आहेत

CM Eknath Shinde scared of his Mother gangubai Sambhaji Shinde
CM Eknath Shinde scared of his Mother gangubai Sambhaji Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज, शुक्रवारी एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीच्या महाकट्टा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शिंदे घरातील एका व्यक्तीला मी भयंकर घाबरत होतो त्यावेळचा किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याबाबत आदरयुक्त भीती होती, त्यापलीकडे जाऊन शिंदे घरातील कोणत्या एका व्यक्तीला मी घाबरत होतो, ते शिंदे यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितलं.(  CM Eknath Shinde scared of his Mother gangubai Sambhaji Shinde )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी माझ्या आईला प्रचंड घाबरायचो. आमची आई म्हणजे बाॅस होती आणि तिला सगळेच घाबरायचे. आईचा दरारा खूप होता. तिचे फटकेही मी अनेकदा खालले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

समाजकारण करत होतो- शिंदे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आईची आपल्याला असलेली दहशत सांगतिली. तसचं रात्री उशिरा घरी आल्यावर आईचे धपाटे पाठीवर पडल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पण मी काही सुधरत नाही असं दिसल्यावर आईने मारणं सोडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोणाला रक्ताची गरज आहे, अॅम्ब्युलन्स, कोणाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचयं, अशी सर्व  लोकांची कामं मी करत राहायचो आणि रात्री उशिरा घरी परतायचो.

अनेक आंदोलनांत घेतला सहभाग 

त्यावेळी अनेक आंदोलन होत असत. तेलाचं आंदोलन, साखरेसाठी आंदोलन, रॉकेलसाठी आंदोलन त्यावेळी मी आंदोलनांमध्ये सक्रिय असायचो. त्यामुळे मला आई म्हणायची की तुलाच का एकट्याला पुळका आहे लोकांचा? कारण आंदोलनांमुळे माझ्यावर अनेक केसेस व्हायच्या पोलीस मला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे त्यामुळे आई चिडायची, असं शिंदे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं दाढी ठेवण्यामागचं कारण; म्हणाले, दाढीमध्ये ‘राज’… )

काहीतरी बनायचंय म्हणून मी कधीच काम केलं नाही 

शिंदे म्हणाले की जेव्हा मी नगरसेवक झालो त्याच्या पाच वर्षांआधी माझ्याच वॉर्डमधील बीजेपीचा दिंगबर धोत्रे म्हणून कार्यकर्ता होता. त्याला बीजेपीने तिकीट द्यायचं ठरवलं मित्र पक्ष म्हणून मी त्यांना दिलं. मी आतापर्यंत मला काहीतरी मिळावं या भावनेनं मी काम केलं नाही कारण अपेक्षाभंग झाल्यावर माणूस निराश होतो आणि निराश माणूस काम करु शकत नाही, म्हणून मी कोणतच काम काहीतरी मिळावं म्हणून करत नाही.