Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचे दुकान लवकरच बंद होईल - एकनाथ शिंदे

डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचे दुकान लवकरच बंद होईल – एकनाथ शिंदे

Subscribe

डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचे दुकान लवकरच बंद होईल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.

डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचे दुकान लवकरच बंद होईल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहेत. मात्र, या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. (CM Eknath Shinde Slams Aaditya Thackeray On Concrete road mumbai)

दरवर्षी नागरिकांना खड्ड्यांचा प्रवास करावा लागतोय. अनेकांना खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला. दरवर्षी मुंबईकरांचा खड्ड्यांमध्ये जाणारा पैसा वाचवण्याचे काम आम्ही या काँक्रिटच्या माध्यमातून करत आहोत. कारण खऱ्या अर्थ्याने डांबरच्या रस्त्यांमधील दुरूस्तीचे पैसे वाचणार आहेत. पुढील 20 ते 25 वर्ष पैसे वाचणार आहे. पण हे काही लोकांना नकोय. पण लोकांना पाहिजे आहे, कारण लोकांचा बळी जाणार नाही, लोकांचा खड्डे मुक्त प्रवास होईल. तसेच डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्या लोकांची दुकान लवकरच बंद होतील, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

- Advertisement -

“काँक्रिटच्या रस्त्यांवरून आपल्या सरकारवर टीका केली जात आहे. आज 400 किलोमीटर काँक्रिटच्या रस्त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पुढच्या महिन्यात आणखी 500 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच पुढील दोन अडीच वर्ष संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि लोकांचे जीवन सुसय्य होईल. परंतु, आपण पाहिलं की याला देखील काही लोकं खोडा घालण्याचं काम करता हेत. पण त्यांना त्यांचे काम करूद्या आपण आपले काम करू”, अशा शब्दांत नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.


हेही वाचा – येत्या दोन-अडीच वर्षांत मुंबईचा कायापालट होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -
- Advertisement -
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -