घरमहाराष्ट्र...म्हणून खड्डेमुक्तीचं काम आतापर्यंत राहिलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना मिश्कील टोला

…म्हणून खड्डेमुक्तीचं काम आतापर्यंत राहिलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना मिश्कील टोला

Subscribe

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मुंबईसह राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राजकारण रंगू लागले आहे. या खड्ड्यांचा आता जनतेलाही मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारला जबाबदार धरत आहे. ज्यावरून आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यातील खड्डेमय रस्त्यावरून तत्कालीन ठाकरे सरकारला मिश्कील टोला लगावला आहे. तसेच मार्चपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिकेतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे आणि खड्डेमुक्त दिसतील, मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दाही महत्त्वाचा असून त्यावर काम सुरु आहे. पुढील 90 दिवसात मुंबईत अनेक बदल दिसतील. छोट्या छोट्या शहरांमध्ये युनिक प्रकल्प राबवले जात आहेत. आज महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. स्वच्छता दूतांचे मी आभारी आहे कारण ते खरे या संकल्पनेचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. त्यांना जर संप पुकारला तर काय होईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

पण तसं आता होणार नाही, कारण सरकार बदललं आहे, आम्ही चांगले मोठं मोठे कार्यक्रम करतो. अडीच महिन्यांपूर्वीच ते केलेले आहेत. सर्वच साफ करायचं आहे. अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी थोडे – थोडे नाही तर 450 किमी रस्ते घ्या असे सांगितले. त्यासाठी ५५० कोटींचा निधी मंजूर केला. पुढच्या मार्चमध्ये मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रेटीकरण होईल, सर्व रस्ते खड्डेमुक्त दिसतील. हे सोपे काम होते तेकरू शकत होते, पण आमचा हातून होणार होते म्हणून ते बहुदा आमच्यासाठी राहिले होते. असं म्हणत मुख्यमंत्री शिदेंनी ठाकरे सरकारला मिश्कील टोला लगावला आहे.

सरकारचे जे पैसे जातात त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जे काम होईल ते टिकाऊ असले पाहिजे. काम करून घेण्याचे काम अधिकाऱ्याचे आहे आणि पैसे देण्याचे काम सरकारचे आहे पण काम चांगले झाले पाहिजे. काही ठिकाणी लोक रस्ते हाताने खोदून दाखवतात एवढं खराब काम आपण कसे खपवून घेत आहोत आता असे झाले नाही पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना इशाराच दिला आहे.


नव्या संसदेतील अशोकचिन्हाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; म्हणाले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -