Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लोकार्पणास विरोध करणाऱ्या विघ्नसंतोषींना जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

लोकार्पणास विरोध करणाऱ्या विघ्नसंतोषींना जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

येत्या २८ मे रोजी देशाची ऐतिहासिक वास्तू असलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे विरोधक विरूद्ध सत्ताधारी अशी खडाजंगी सध्या सुरू आहे. दरम्यान विघ्नसंतोषी लोक लोकार्पणाच्या कामास विरोध करतात. त्यामुळे जनताच त्यांना धडा शिकवेल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून निती आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ही बैठक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या संसद भवनाचं काम योग्य वेळेत पूर्ण झालं आहे. २०१९ला बांधकामासाठी सुरूवात झाली आणि २०२३ मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. ही संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. संसद भवन हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. याठिकाणाहून आपण देशातील जनतेला न्याय देत असतो. त्यामुळे लोकार्पणादिवशी सगळ्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. परंतु काही यामध्ये विघ्नसंतोषी लोकं असतात. त्यांनी विरोध करणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. विरोधकांमध्ये पोटदुखी सुटलीये. जनता सूज्ञ असल्यामुळे विरोध करणाऱ्यांना जनता जमाल गोटा देऊन धडा शिकवेल.

- Advertisement -

निती आयोगाच्या बैठकीला मी जातोय. या बैठकीत शेतकरी आणि विकासांच्या प्रश्नांसह अनेक मुद्दे मांडणार आहे. निती आयोगाची बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही बैठक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी किंवा राज्याची जी काही धोरणं आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारकडून आम्हाला मदत मिळत असते. त्यामुळे निती आयोगाची बैठक आमच्या राज्यासाठी आणि इतर राज्यासाठीही खूप महत्त्वाची आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षांकडून निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आलाय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्राची मदत मिळते. त्यामुळे राज्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, याबाबत प्रत्येकाला विचार करावा लागतो, असंही शिंदे म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : संसद भवनाच्या ऐतिहासिक कामामुळे विरोधकांना पोटदुखी, मुख्यमंत्री शिंदेंची टीका


 

- Advertisment -