‘काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ द्यायचं नव्हतं पण…’; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील मेट्रो २ अ, मेट्रो ७ च्या उद्धाटनासाठी दाखल झाले आहेत. वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकलून येथील मैदानात या उद्घटनाच्या पार्श्वभूमीवर मोदींची सभा आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधताना विरोधकांवर निशाणा साधला.

काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ नये असे वाटतं होते. पण नियतीसमोर कोणाचेच चालत नाही. महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा होती की, या मेट्रोचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्धाटनासाठी व्यासपीठावर आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (CM Eknath Shinde Slams Opposition On PM Modi Inaugurates metro)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील मेट्रो २ अ, मेट्रो ७ च्या उद्धाटनासाठी दाखल झाले आहेत. वांद्र्यातील वांद्रे कुर्ला संकलून येथील मैदानात या उद्घटनाच्या पार्श्वभूमीवर मोदींची सभा आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधताना विरोधकांवर निशाणा साधला. “काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ नये असे वाटतं होते. पण नियतीसमोर कोणाचेच चालत नाही. तसेच, आज तुम्ही जे पाहताहेत ती आमची इच्छा आणि अपेक्षा होती. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा होती की, या मेट्रोचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्धाटनासाठी व्यासपीठावर आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

“ऑक्टोबर 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मेट्रोचे भूमीपूजन केले होते आणि आता त्यांच्याच हस्ते या मेट्रोचे उद्धाटन होत आहे. आजच्या दिवसाची सुरूवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी ठरेल.”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्याशिवाय, “गतवर्षी डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. तसेच, आता मुंबईकरांसाठी नव्या वर्षाची सुरूवात आपण नवे प्रकल्प आणि मेट्रो सुरू करून करतो आहे. खऱ्या अर्थाने एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीमध्ये झाला. एक कार्यक्रमत आता आर्थिक राजधानीत होत आहे. मोदींकडून महाराष्ट्राला विशेष अपेक्षा आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“गेल्या अडीच वर्षात काय झाले यावर मी काही बोलणार नाही. राज्यात आज सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.


हेही वाचा – डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचे दुकान लवकरच बंद होईल – एकनाथ शिंदे