Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर 'अडीच वर्षांत सर्व पायाभूत सुविधा मंदावल्या', मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

‘अडीच वर्षांत सर्व पायाभूत सुविधा मंदावल्या’, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात वंदे मातरम् सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनेक भूमीपजनं आणि उद्धाटन करण्यात आली.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात वंदे मातरम् सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अनेक भूमीपजनं आणि उद्धाटन करण्यात आली. या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकावर टीका केली. (CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray In Marathwada)

“राज्यभरातीय पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. आपले सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्षात या सर्व पायाभूत सुविधा मंदावल्या होत्या. कामा ठप्प होती. पण आपले सरकार येताच आपण सर्व कामांना चालना दिली. त्यामुळे आज आपण अनेक उपक्रम करत आहोत”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

- Advertisement -

“मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आपण अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहोत. दिल्लीतील काही कामांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच्या या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पण त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आज आपण काही भूमीपुजनं आणि उद्धाटनं केली. याच्या माध्यमातून शासनाकडून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा सर्वच मराठवाड्याला आणि लोकांना आहे”, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देत सर्वस्वाचा त्याग केला, त्या हुतात्म्यांना अभिवादन. मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी आहे. महान आणि पराक्रमी अशा व्यक्तिमत्वांची ही भूमी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी शिक्षणसंस्था सुरू केल्या. मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी दुसरा स्वातंत्र्यसंग्राम केला. निझामाच्या राजवटीच्या विरोधात प्रतिकार केला असून लढा दिला. अगदी लहान थोर आणि माता-भगिनी आणि बाधवांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्टा केली. त्यांच्या या बलिदानामुळे आपण आजचा दिवस पाहतोय”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – त्याच घोषणा आणि तीच फसवणूक… ठाकरे गटाची राज्य सरकारवर जोरदार टीका

- Advertisment -