Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कानपिचक्या

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कानपिचक्या

Subscribe

तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री असल्याने मंत्रालयात बसून पावसाळी कामांचा आढावा घ्या असे मला सांगितले जात होते. मात्र मी एका जागी बसून आढावा घेणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळेच मी स्वतः नालेसफाईच्या कामांची माहिती घेण्यासाठी पाहणी दौऱ्याला आलो, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या.

तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री असल्याने मंत्रालयात बसून पावसाळी कामांचा आढावा घ्या असे मला सांगितले जात होते. मात्र मी एका जागी बसून आढावा घेणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळेच मी स्वतः नालेसफाईच्या कामांची माहिती घेण्यासाठी पाहणी दौऱ्याला आलो, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या. (CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray Maharashtra VVP96)

गेल्या २५ वर्षात ज्या पद्धतीने नालेसफाई, रस्ते कामे व्हायला पाहिजे होती तशी कामे झाली नाहीत. त्यामुळेच आता आम्ही साचलेली घाण साफ करीत आहोत. जुनी सिस्टीम बदलत आहोत, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणे मारले. मुख्यमंत्री शिंदे यांनी, गुरुवारी मिठी नदी, वांद्रे पूर्व येथे नंतर वाकोला नदी, होल्डिंग पाँड, प्रमोद महाजन, दादर, लव्ह ग्रोव नाला, वरळी आणि लव्ह ग्रोव स्ट्रॉम वॉटर पंपींग स्टेशन, वरळी येथे पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या भाषेत उत्तरे दिली.

- Advertisement -

याप्रसंगी, मुंबई उपनगर भागाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा पालिका आयुक्त इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, आमदार सदा सरवणकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, अमेय घोले, पालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप खोटे

- Advertisement -

दर्जेदार रस्ते बनविण्याच्या नावाखाली ९०० कामांपैकी अद्याप २५ कामेही पूर्ण झालेली नसताना कंत्राटदारांना ६०० कोटींची खिरापत वाटण्यात आली, असा आरोप युवासेना नेते, माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी केला असून त्याबाबत राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, सदर आरोप खोटे व चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते फेटाळून लावले.

वास्तविक, यापूर्वी तेच तेच कंत्राटदार नालेसफाईची व रस्त्यांची कामे करीत असत. मात्र आता कंत्राटदार बदलले आहेत. त्यांनी जर कामचुकारपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र आता काही लोक कंत्राटदारांची भाषा बोलू लागले आहेत, असा टोमणा मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

गेल्या २५ वर्षातील कामांची, भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

मुंबई महापालिकेने केलेल्या विकास कामांबाबत आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत चौकशीची मागणी केली. पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये हजारो कोटींची घट झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्याचा समाचार घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी, गेल्या २५ वर्षात महापालिकेने जी काही विकासकामे केली त्यांची चौकशी लोकायुक्त यांच्याकडून, कॅगकडून व्हायला पाहिजे, असे उत्तर देत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना सुनावले. ‘दूध का दूध व पानी का पानी’ होईल. वास्तविक, जनतेचा पैसा हा जनतेच्या कामांसाठीच व्हायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भाजपचा महापौर झाला तरी तो युतीचाच महापौर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी, आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल व भाजपचाच महापौर होईल, अशी शक्यता वर्तवली. भाजपचा महापौर झाल्यास तुम्हाला ते मान्य आहे का, असे विचारले असता, भाजपचा महापौर झाला तरी तो मित्र पक्षाचा महापौर असेल. मात्र अद्याप निवडणुका लागलेल्या नाहीत, असे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच, ज्यांनी मुंबईकरांना हातात सत्ता असतानाही सुविधांपासून वंचित ठेवले व त्रास दिला ही बाब मुंबईकर विसरणार नाहीत. ते अशा लोकांना सत्तेपासून वंचित ठेवतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना – भाजप निवडणूक लढविणार

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही भाजप सोबत युती करून लढविणार आहोत. गेल्या २५ वर्षात जी विकासकामे झालेली नाहीत ती कामे आम्ही सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करीत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याने स्वागत

बैलगाडी शर्यतील सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. खरे तर हा शेतकऱ्यांचा विजय आहे.शेतकरी व बैल ही सर्जा राजाची जोडी आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


हेही वाचा – संघाच्या माध्यमातून देशाला…; कुरुलकरांच्या अटकनंतर नाना पटोलेंचा गंभीर आरोप

- Advertisment -