‘राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाला साकडं

आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) महापुजेनंतर राज्यातील जनतेसाठी विठुरायाला साकडं घातले आहे.

Shiv Sena rally in Pandharpur presence of Chief Minister Eknath Shinde

आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) महापुजेनंतर राज्यातील जनतेसाठी विठुरायाला साकडं घातले आहे. तसेच, ‘राज्याला कृषी, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात चांगलं यश मिळो’, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. (cm eknath shinde speech reaction after pandharpur maha pooja) त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आषाढी एकादशीच्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडं

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. या पुजेनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विठुरायाला साकडं घातले. “राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, समाजातील सर्व घटकांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं जावो, कोविड संकट कायमस्वरुपी जावं. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. राज्यातील बळीराजा, कष्टकरी, समाजातील प्रत्येक घटकांना सुख समृद्धी मिळो. राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा. गोरगरीब सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल”, असे साकडे त्यांनी घातले.

पंढरपूरचा विकास आराखडा तयार करणार

“राज्याला कृषी, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात चांगलं यश मिळो अशी प्रार्थना आहे. माझ्यासाठी आजचा दिवस भाग्याचा असून, हा दिवस मी कदापि विसरु शकणार नाही. राज्याच्या जनतेसाठी जेवढे काही करता येईल तेवढे मी करेन. वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. माझ्या कार्यकाळात मी वारकऱ्यासांठी पंढरपूरचा विकास आराखडा तयार करणार आहे. स्वच्छ आणि सुविधायुक्त पंढरपूर साकारणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल. हा पांडुरंग सर्वसामान्यांचा देव आहे. यासाठी जे काही लागेल ते शासन देईल”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यावरही एकनाथ शिंदे यांनी बातचीत केली. “राज्यात सर्व ठिकाणी चांगला पाऊस पडतोय. कुठेही जीवितहानी होऊ नये, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्र सरकार देखील राज्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे”, असेही त्यांनी म्हटले.


हेही वाचा – पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण; ५९ जणांचा मृत्यू