घरताज्या घडामोडीजैन समाज हा दुसऱ्यांच्या सुखदुःखात साथ देणारा समाज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गार

जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुखदुःखात साथ देणारा समाज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गार

Subscribe

जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुखदुःखात साथ देणारा समाज असून समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांचा आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जैन समाजासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी जैन समाजाप्रती भावना व्यक्त केली.

जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे. राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यामध्ये सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. तसेच या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले. तसेच या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -


हेही वाचा : ठाण्यात SRA ची गरजच काय? हे कार्यालय बंद करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -