‘लवकरच सगळ्या गोष्टी होतील…’; मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

जवळपास महिन्याभरानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंजे गटाच्या आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी, खातेवाटप कधी होणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

1 thousand 64 candidates from maratha reservation selection list will be appointed immediately says cm eknath shinde

जवळपास महिन्याभरानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंजे गटाच्या आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी, खातेवाटप कधी होणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. अशातच मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी साताऱ्यांच खातेवाटपाबाबत भाष्य करत या चर्चंना पूर्णविराम दिला आहे. “मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्याचप्रमाणे खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी होतील. त्या वेळेवरच होतील”, असे शिंदे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी गेले होते. त्यावेळी गावात दाखल झाल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचित करताना खातेवाटपाबाबत भाष्य केले. “मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असं विचारलं जात होतं, तो झाला. त्याप्रमाणे खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी होतील. त्या वेळेवरच होतील. पण आम्ही कुठेही विकासाची कामं थांबू दिलेली नाहीत. कालच आम्ही अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर भरघोस अशी मदत दिली आहे. एनडीआरएफच्या नियमाच्याही दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. २ हेक्टरची मर्यादा होती, ती वाढवून आम्ही 3 हेक्टर केली आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

याशिवाय “राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच, माणूस कधीच आपले मूळ विसरत नाही. हे मूळ आहे. इथली सगळी माणसे जिवाभावाची आहेत. या भागासाठी विकासात्मक गोष्टी नक्कीच आम्ही करू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्री संपूर्ण राज्याचा विकास करतीलच. त्याचबरोबर ही निसर्गसंपदा इथे आहे. पर्यटनाला खूप वाव आहे. त्याला चालना देण्याचं काम आम्ही करू”, असेही शिंदे यांनी म्हटले.

“मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मगावी आलो आहे. लोकांचं प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. समाधान वाटले. माझी कर्मभूमी ठाणे-मुंबई आणि जन्मभूमी ही आहे. इथल्या भूमीपुत्रांनी मला बोलवलं म्हणून मी आलो. आपला माणूस मुख्यमंत्री झाला आहे अशी प्रत्येकाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतेय. यापेक्षा दुसरं समाधान कुठलं नाही”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – तुमच्यावर आमचा वॉच आहे, चुकीचे निर्णय घेतले तर समर्थन नाही; मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांना सुनावले