घरमहाराष्ट्रसाडेतीन महिन्यांत ७२ मोठे निर्णय घेतले; रोजगार मेळाव्यात शिंदेंची माहिती

साडेतीन महिन्यांत ७२ मोठे निर्णय घेतले; रोजगार मेळाव्यात शिंदेंची माहिती

Subscribe

साडेतीन महिन्यात ७२ मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी घेतले, दुष्काळग्रस्त भागात समुद्राकडे वाहून जाणारं पाण्याचा प्रकल्प घेतला. सिंचन प्रकल्प सुरू केले. कामगारांसाठी नियुक्त्या सुरू केल्या. राज्याला पुढे नेण्यासाठी काम करतोय. अनेक योजना आहेत. सगळ्याच घटकांना मदत करतोय. वर्षभरात ७५ हजार रिक्त पदे भरली जातील. स्वयंरजोगर, रोजगार वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहोत.

मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने १० लाख रोजगार अभियानाला सुरुवात केली आहे. याच अभियानाचा भाग म्हणून आज महाराष्ट्रातही ७५ हजार रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोजगार मेळाव्यात आज दोन हजार नियुक्त्या देण्यात येणार आहेत. तर उर्वरित नियुक्त्या टप्प्याटप्प्याने दिल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत सरकारने तब्बल ७२ मोठे निर्णय घेतले असल्याचीही माहिती शिंदे यांनी दिली. मुंबईत राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

हेही वाचा सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता येणार; महामेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या राज्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आनंद सोहळा आहे. भरती कधी होणार, नियुक्त्या कधी होणार असे प्रश्न विचारले जायचे. या सगळ्याच्या दृष्टीने आजचा महत्त्वाचा दिवस आहे. यंदा आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. त्यानिमित्त मोदींनी १० लाख नोकऱ्या जाहीर केल्या. आमच्या मंत्रिमंडळानेही ७५ हजार नोकऱ्या देऊ अशी घोषणा आम्ही केली. टप्प्याटप्याने नियुक्त्या जाहीर करू. वर्षभरात ७५ हजार नियुक्त्या द्यायच्या आहेत. मोदींना रोजगार मेळावे घेतले, नियुक्त्या पत्रांचे वाटप केलं त्यात महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे. त्यामुळे मोदींनाही आनंद झाला.

राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार

- Advertisement -

‘राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. रस्त्याचे ५० हजार कोटीसह इतर प्रकल्पासाठी निधी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडून आपल्याला मिळत आहे. १४ हजार कोटींचा युडीच्या प्रकल्पासाठी एकही रुपया कमी केला नाही. सगळे मंजूर केले. राज्याच्या मागे केंद्र सरकार आहे. राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम सरकार करतंय. तरुणांना रोजगार देण्यासाठी हा पहिला टप्पा सुरू केला. पहिल्या टप्प्यात २ हजारापेक्षा जास्त नियुक्त्या देत आहोत. येथे ६०० नियुक्त्या देत आहेत. उर्वरित टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. एमपीएससीही चांगलं काम करतंय,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

विभागवार भरतीला प्राधान्य दिलंय. गेले अडीच वर्षे काहीच नव्हतं. सरकार बदललं, वातावरण बदललं, उत्साह आला. दोन तीन महिन्यात सण उत्सव साजरे करू लागले. चैतन्य आलं की नाही. सण उत्सव पाहिजेच. आनंदाचा शिधा पोहोचला. थोडं मोठं काम आहे, त्यामुळे थोडं मागे पुढे होईल. या राज्याला पुढे जायचंय, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.


सरकारी अधिकाऱ्यांचं कौतुक

आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे. तरुणांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा. नोकर भरतीचं काम अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केलं. त्यांचं कौतुक. त्यांचंच काम अपेक्षित आहे. बदल लोकांच्या जीवनात आला पाहिजे. लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

साडेतीन महिन्यात ७२ मोठे निर्णय

साडेतीन महिन्यात ७२ मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी घेतले, दुष्काळग्रस्त भागात समुद्राकडे वाहून जाणारं पाण्याचा प्रकल्प घेतला. सिंचन प्रकल्प सुरू केले. कामगारांसाठी नियुक्त्या सुरू केल्या. राज्याला पुढे नेण्यासाठी काम करतोय. अनेक योजना आहेत. सगळ्याच घटकांना मदत करतोय. वर्षभरात ७५ हजार रिक्त पदे भरली जातील. स्वयंरजोगर, रोजगार वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहोत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -