घरताज्या घडामोडीशिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील : दीपक केसरकर

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील : दीपक केसरकर

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसला मेळाव्याला परवानगी दिली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसला मेळाव्याला परवानगी दिली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा मेळावा कुठे होणार याबाबतच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. याबाबत आता राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. आमचा मेळावा निश्चित होणार आहे, आमच्या मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. (CM eknath shinde to take decision on Dussehra gathering of Shinde group says Deepak Kesarkar)

मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी “आमचा दसरा मेळावा निश्चित होणार आहे. तसेच, हा दसरा मेळावा कुठे होणार याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मी अगोदरचे मेळावे पाहिले आहे, अनेक लाख-लाख लोकांचे मेळावे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होत आहेत. राज्यभरातून एकनाथ शिंदे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी केवळ एकनाथ शिंदे यांनी लढा दिला”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

- Advertisement -

“कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करणे, हे बाळासाहेब ठाकरे यांना कधीच मान्य नव्हते. तसेच, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याची वेळ आली तर, मी माझा प्रसंगी पक्ष बंद करीन. बाळासाहेबांच्या याच विचारावर आम्ही जात आहोत. तसेच आता परवानगी मिळाल्यानंतर जे जल्लोष साजरा करत आहेत. त्यांना असे वाटत असेल की आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर पुढे जात आहोत, तर त्यांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी संपल्याचे जाहीर करावे, तरच हिंदूत्यावाच्या विचाराने जाण्याचा त्यांना अधिकार असेल” असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.


हेही वाचा – शिवाजी पार्कात ठाकरेंच्याच शिवसेनेचा ‘आवाज’; दसरा मेळाव्याला मुंबई हायकोर्टाची मंजुरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -