घरमहाराष्ट्रवर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'या' दिवशी जाणार राहायला

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी जाणार राहायला

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर केव्हा राहायला जाणार यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झाल्या. यातच एकनाथ शिंदेंनी काल वर्षा बंगल्याला भेट दिली. शिंदेंनी वर्षा बंगल्यावरील डागडुजी आणि नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. सध्या मुख्यमंत्री शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेल्या नंदनवन बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वर्षावर केव्हा राहायला जाणार यावर बरीच चर्चा रंगली. अशात शिंदे यांनी काल वर्षा बंगल्यामधून बाहेर पडताना इथे केव्हा राहायला येणार? याचे उत्तर दिले आहे. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, अजून राहायला येण्यास वेळ आहे. तर हसत पुढे म्हणाले की, अजून 15 – 20 दिवस लागतील.

एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अखेर 39 दिवसांनी शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरील कामाची पाहणी करण्यास आले होते. या बंगल्याबाहेर मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची नेम प्लेट लावण्यात आली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून बंगल्याच्या डागडुजीचे काम सुरु आहे. यावेळी वर्षा बंगल्याची पाहणी करून बाहेर निघताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

हेही वाचा : …तर असं समजा जेवणारी चौथी व्यक्ती मोदी होती, जीएसटीवरून बाळासाहेब थोरातांची टीका

पत्रकारांनी भाई भाई हाक मारत मुख्यमंत्री शिंदेंची गाडी थांबवत त्यांना वर्षावर राहण्यासाठी येण्यासंदर्भात प्रश्न विचारले. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, राहायला नाही आलो बाबा, पाहणी करण्यासाठी आलो होतो. रहायला येण्यासाठी वेळ आहे. यानंतर पत्रकारांनी पुजा वैगरे कधी? असही प्रश्न विचारला, ज्यावर शिंदे म्हणाले की, अरे बाबा पाहायला आलोय, राहायला यायला अजून वेळ आहे, थोडं काम अजून बाकी आहे. ते झालं की नक्की रहायला येऊ. यावर पत्रकार पुन्हा प्रश्न करतात की, कधीपर्यंत रहायला येण्याची शक्यता आहे? ज्यावर शिंदे हसत म्हणाले की, अजून 15 – 20 दिवस लागतील.

जूनच्या पहिल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीमुळे वर्षा हा शासकीय बंगला सोडून मातोश्रीवर मुक्काम हलवला. तेव्हापासून वर्षा बंगला रिकामी होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले, हे खातं महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे सांभाळत होते. दरम्यान सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहण्यास जाणार नसल्याची चर्चा रंगत होत्या. हा बंगला सरकारी बैठकींसाठी वापरला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला बंगल्याचे नाव आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ संभाजी शिंदे अशी नेम प्लेट आहे.


भाजपने मित्र पक्षांना धोका दिला नाही; बिहार राजकारणावरून फडणवीसांनी शिवसेनेवर साधला निशाणा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -