शिंदे गट भाजपप्रणीत एनडीएत सहभागी होणार? मुख्यमंत्री मोदींची भेट घेणार

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनुमती दिल्यास खासदार राहुल शेवाळे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते असतील आणि तसे पत्र शिंदे गटाकडून लोकसभा अध्यक्षांना आज, मंगळवारी दिले जाणार असल्याचे समजते.

eknath shinde and narendra modi

शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेतील १२ खासदारांना गळाला लावून शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी चालवली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १८ पैकी बाराहून अधिक खासदार आपल्याकडे असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असून शिवसेनेतील राष्ट्रीय पातळीवरील फूट मंगळवारीच पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनुमती दिल्यास खासदार राहुल शेवाळे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते असतील आणि तसे पत्र शिंदे गटाकडून लोकसभा अध्यक्षांना आज, मंगळवारी दिले जाणार असल्याचे समजते. (CM Eknath Shinde will meet PM Narendra modi)

हेही वाचा – शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, रामदास कदम यांची नेतेपदी पुनर्नियुक्ती

राष्ट्रपतिपदाच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे गटाची ऑनलाइन पद्धतीने एक बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या १२ खासदारांनी हजेरी लावल्याचे समजते. या बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंद सोमवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आपल्यासोबतच्या खासदारांचा गट एनडीएसोबत असल्याची माहिती या बैठकीत शिंदेमाझं ‘तेच’ हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला देणार असल्याचे समजते.

नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदिल दिल्यास मंगळवारीच लोकसभेत यासंदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याचेही समजते. त्यांच्याकडून तूर्त थांबण्याचा सल्ला दिल्यास त्याप्रमाणे खासदारांबाबत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे कळते.

हेही वाचा – शिंदेंच्या गटाला सेनेच्या 12 खासदारांचा पाठिंबा?, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार

राज्यात निर्माण झालेल्या सत्तापेचावरील सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणार असून दिल्लीसाठी रवाना झालेले एकनाथ शिंदे या दौऱ्यादरम्यान कायदेशीर बाजूंचे मार्गदर्शनही घेणार असल्याचे कळते. आज दिवसभर ते दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठी आणि कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असून रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत.

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत असल्याची चर्चा सुरू आहे, त्याविषयी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, मला वाटते आमच्याबरोबर सगळेच खासदार आहेत. हिंदुत्वाचा विचार आमच्यासोबत आहे. त्यामुळे हाच विचार अधिक व्यापक प्रमाणावर पसरवण्याची आमची भूमिका असेल.

तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मात्र शिवसेनेचे सर्व खासदार आमच्या सोबत असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. न्यायालयीन सुनावणीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे गटाची पावले पडत आहेत. शिवसेना संपविण्याचे कारस्थान महाराष्ट्राला कधीच मान्य होणार नाही. भाजपचा हा शिवसेना संपविण्याचा डाव आहे, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.

हेही वाचा – माझं ‘तेच’ हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले खासदार

  • गजानन कीर्तिकर – मुंबई उत्तर-पश्चिम,
  • संजय जाधव – परभणी,
  • ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद,
  • अरविंद सावंत – मुंबई दक्षिण,
  • विनायक राऊत – रत्नागिरी सिंधुदुर्ग
  • राजन विचारे – ठाणे,
  • कलाबेन डेलकर – दादरा, नगर हवेली