Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या 'अक्षय्य तृतीया' 'रमजान ईद'च्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या ‘अक्षय्य तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

Subscribe

साडेतीन मुहूर्तांपैकी एक 'अक्षय तृतीया' अणि पवित्र अशा रमजान अर्थात 'ईद-उल-फित्र' या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील रमजान ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान अर्थात ‘ईद-उल-फित्र’ या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील रमजान ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही सणांच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, आपल्या हिंदू संस्कृतीत अक्षय्य तृतीया हा दानधर्माचे महत्व सांगणारा सण आहे. या दिवशी शुभारंभ होणाऱ्या गोष्टी अक्षय्य, अखंडपणे चालू राहतात. असा हा सकारात्मक ऊर्जा देणारा सण आहे.

- Advertisement -

मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो. या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी. विविध क्षेत्रातील नवनव्या योजना, प्रकल्प यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त व्हावा, हीच मनोकामना. सर्वांना अक्षय्य तृतीया आणि ईदच्या मनापासून शुभेच्छा.

राष्ट्रपती मुर्मूंसह पंतप्रधान मोदी यांनी ‘रमजान ईद’च्या दिल्या शुभेच्छा
गेल्या महिनाभरापासून देशात रमजान ईद या पवित्र सणाचा उत्साह मुस्लीम समाजामध्ये पाहायला मिळत आहे. आज देशभरात आनंदात आणि जल्लोषात ईद सण साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देखील देशभरातील नागरिकांना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रपती भवनाकडून शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईद हा पवित्र रमजान महिन्याचा शेवट आहे. ईद हा प्रेम आणि करुणेच्या भावना सामायिक करण्याचा सण आहे. हा सण आपल्याला एकोप्याचा आणि परस्पर सामंजस्याचा संदेश देतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी जगभरातील लोकांना शांती, आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा – Satya Pal Malik : शायद, इसलिए बुलावा आया है… सीबीआयच्या समन्सवर मलिक यांची प्रतिक्रिया

- Advertisment -