घरमहाराष्ट्रविरोधक समाजात भांडणं लावण्याचा काम करतात - CM

विरोधक समाजात भांडणं लावण्याचा काम करतात – CM

Subscribe

शिवाय विरोधक मुस्लिम समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल पटलावर मांडण्यावरून आज विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. या चर्चे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे, असं जाहीर केलं. पण मराठा आरक्षणाबाबत विरोधकांच्या मनात खोट असल्याची टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच विरोधक मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवण्याचं काम करत आहेत. शिवाय विरोधक मुस्लिम समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणाबद्दल सरकार कायद्यानुसार काम करतंय. राज्यात ५० टक्के आरक्षण लागू आहे. त्यामुळे एसईबीसीचं २ टक्के आरक्षण जिवंत आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

तर, दुसरीकडे सरकार विधेयकाबाबत लपवा – छपवी करत आहेत. त्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वी अहवालात काय आहे? तसेच विधेयक मांडताना कोणीही खोडा घालणार नाही असं अजित पवार यावेळी बोलले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गदारोळ उडाला. यावेळी मराठा आरक्षणाशिवाय मुस्लिम आणि धनगर आरक्षणावरून देखील विधानसभेत गदारोळ उडाल्याचं पाहायाला मिळालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -