घरट्रेंडिंगसीएमसाहेब माझं लग्न लावून द्या; नाहीतर जीव देतो

सीएमसाहेब माझं लग्न लावून द्या; नाहीतर जीव देतो

Subscribe

उत्तम नोकरी आहे, चांगला पगार, स्वत:च घर असं सुखी जीवन असतानाही पुण्यातल्या एका तरूणाने मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. आता एवढ सगळं उत्तम सुरू असताना या तरूणाला इच्छा मरण का हवय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? पण याच कारणही काहीस वेगळं आहे. आपल्याला लग्नानाला मुलगी होकार देत नाही म्हणून या तरूणाने इच्छा मरणाची मागणी केली आहे. आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी या तरुणाने केली.

त्याच्या या अजब मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. या तरुणाचे मन वळवण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांनाही या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळवले आहे.

- Advertisement -

Permission Letter to CM

का देतायत मुली नकार

आपल्या आजारी असणाऱ्या आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार आपल्याला मिळावी हा त्याचा हट्ट आहे. त्यामुळे आलेले सर्वच स्थळं त्याला नाकारत असत. शेवटी नैराश्यात येऊन त्याने चक्क मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली.त्याच्या आईला पार्किन्सन्सचा आजार आहे. तर वडील 85 वर्षांचे झाले आहेत. ऑफीसचं काम आणि आई-वडिलांची जबाबदारी हे एकट्यालाच बघावं लागतं. घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणीतरी हातभार लावावा हा विचार करून लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली. बहुतांश मुलींनी त्याला त्याच्या आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. आई-वडिलांना सोडून जाणे शक्य नसल्याने या तरुणाने चांगली संधी असलेल्या इतर राज्यातील नोकऱ्यांकडे पाठ फिरवली.

- Advertisement -

आपलं दु:ख सांगायचं कोणाला या विवंचनेत सापडलेल्या या तरुणाने अनेकदा आत्महत्येचाही विचार केला. पण आत्महत्या हा गुन्हा आहे हे माहित झाल्यानंतर त्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी या तरुणाला शोधून त्याची भेट घेतली, त्याची समजूत काढली. एरवी पोलिसी खाक्या मिरवणाऱ्या पोलिसांची यावेळी एक हळवी बाजू समोर आली.
पोलिसांच्या समजवण्यामुळे या मुलाने आपल्या मनातील आत्माहत्येचा विचार काढून टाकला आहे. पण आजा समाजात याच्यासारखे अनेक तरूण आहेत जे नैरास्यातून आत्महत्येचा विचार करतात. त्या तरूणांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -