घरमहाराष्ट्रबांगर जरा सबुरीने घ्या, व्यवस्थापक मारहान प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सल्ला

बांगर जरा सबुरीने घ्या, व्यवस्थापक मारहान प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सल्ला

Subscribe

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. सत्ते येाताच आमदारांची दादागिरीची वक्तव्ये, अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न झालेली मदत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, अशा मुध्यांवरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात पहिल्या दिवशी खडाजंगी झाली नाही. मात्र, विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता मुख्यमंत्र्यांनी राडेबाज आमदारांना समज दिली.

मुख्यमंत्र्यांनी आमदार संतोष बांगरांना दिली समज –

- Advertisement -

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना धीराने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. प्रश्न जरी बरोबर असला तरी तुमच्या रिअॅक्ट करण्याची पद्धत बरोबर नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना समजावले. तसेच यापुढे असे प्रकार टाळते आले तर पाहा, अशी सूचनाही केली. पुढे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपले सरकार कसे चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा, असे आदेश देताना आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपले वर्तन व्यवस्थित असले पाहिजे. एखादी गोष्ट समाजावून सांगताना ती लोकशाही मूल्ये आणि संविधानिक भाषेत समजावून सांगावी. आपल्याकडून कोणतंही चुकीचे वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.

काय घडले –

- Advertisement -

कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचं सांगत हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. उपहारगृहाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या बांगरांची तेथील जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून सटकली अन् त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाला थोबडवले. स

विरोधकांनी घेतला आक्षेप –

संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना खडसावत “सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?” असे म्हणत आमदार बांगर यांच्यावर तोंडसुख घेतले. विरोधकांच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष बांगर यांना समज दिली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -