घरमहाराष्ट्रCM म्हणजे करप्ट मॅन;160 कोटींची कामं 263 कोटींना दिली,आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर गंभीर...

CM म्हणजे करप्ट मॅन;160 कोटींची कामं 263 कोटींना दिली,आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर गंभीर आरोप

Subscribe

रस्त्यांच्या कंत्राटाची कामं जी 160 कोटींची होती ती 263 कोटींना दिली गेल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मागच्या सहा-सात महिन्यांत मुंबई महानगरपालिकेचे अनेक घोटाळे आम्ही समोर आणले आहेत. रस्त्यांचा घोटाळा, खडींचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यांबाबत सर्व माहिती राज्यपाल रमेश बैस यांना दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी रस्त्यांच्या कंत्राटाची कामं जी 160 कोटींची होती ती 263 कोटींना दिली गेल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ( CM means Currupt Man BMC Curroption 160 crores worth of work given to 263 crores Aditya Thackeray s serious accusation against Eknath Shinde Government )

हे सगळे घोटाळे मुंबईत असणाऱ्या प्रशासकांच्या अंधाधुंदी कारभारामुळे होत आहेत. राज्यात बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकारमुळे राज्यात 6 हाजर कोटींचा रस्त्यांचा घोटाळा होत आहे. 900 रस्ते जे 400 किलोमीटरचे होणार होते त्यातलं 10 सुद्धा रस्ते झाले नाहीत, त्यांना खूप उशिर होत आहे. याबाबत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पत्र देऊनही प्रशासकाकडून काहीही कारवाई केलेली नाही.

- Advertisement -

एका विशिष्ट कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेले. त्या कंपनीमुळे मुंबईतील काम 3 आठवडे रखडली. गोखले पुले, डिलाय रोड रखडली. त्यामुळे पावसाळ्याआधी पूर्ण होणारी कामं अजूनही रखडली आहेत, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. स्ट्रीट फर्नीचर घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्या एका मित्रासाठी 160 कोटींची काम ही 263 कोटींना दिली आहेत, असं म्हणत ठाकरे यांनी शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. सीएम म्हणजे करप्ट मॅन म्हणत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. पुण्यातील महानगरपालिका पुण्यातील नद्या, टेकड्यांच सपाटीकरण करत आहे त्याबाबतही राज्यपालांना माहिती दिल्याचं, ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्याच्या सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयावर आमाचा विश्वास आहे. तसंच, आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षपदावरही चॅलेंज केल्याचं ते म्हणाले.

तसचं, उद्या, 11 मे ला नितिश कुमार आणि तेजस्वी यादव उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -