Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र दुसऱ्यांचं घर जळताना आसूरी आनंद घेणारी लोकं; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

दुसऱ्यांचं घर जळताना आसूरी आनंद घेणारी लोकं; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

Subscribe

 

साताराः स्वतःचं घर जळत असताना त्याकडे बघायचं नाही. पण दुसऱ्यांचं घर जळताना आसूरी आनंद घेणारी ही लोकं आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न विचारण्यात आले. हा मोदी-शाह यांचा पराभव आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यावर तुमचे म्हणणे काय आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बेगानी शादी में अब्दुला दिवाना, अशी त्यांची अवस्था झाला ईहे. पराभव कोणाचा, विजय कोणाचा. प्रतिक्रिया देतय कोण. खरं म्हणजे स्वतःचं घर जळत असताना त्याकडे दुर्लक्ष करायच. पण दुसऱ्यांचं घर जळताना आसूरी आनंद घेणारी ही लोकं आहेत.

देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करु शकतो हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला आहे. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिय उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा आणि आशेचा किरण दाखवला आहे. कॉंग्रेसचा प्रचंड विजय झालाच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले आहे.

- Advertisement -

कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुस्लिम, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. कॉंग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ च्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांचे खास अभिनंदन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेवरही मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली. बेगानी शादी में अब्दुला अशी त्यांची अवस्था झाली आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. जनतेने वेळोवेळी योग्य तो निर्णय घेतला आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

- Advertisment -