घरमहाराष्ट्रCM Shinde: मुख्यमंत्री शिंदे ज्युपिटर रुग्णालयात; महेश गायकवाडसह जखमींची विचारपूस

CM Shinde: मुख्यमंत्री शिंदे ज्युपिटर रुग्णालयात; महेश गायकवाडसह जखमींची विचारपूस

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

उल्हासनगर: उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपापसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची चौकशी केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रुग्णालयात पोहोचले आहेत. (CM Shinde Chief Minister Eknath Shinde at Jupiter Hospital Interrogated those injured in the firing along with Mahesh Gaikwad)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली, तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री जवळपास 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले होते. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता, त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला”, अशी कबुलीच गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली.

कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Bharatratna: उशीर केला पण, भारतरत्न घोषित झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य; शरद पवारांची प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -