घरमहाराष्ट्रCM Shinde: अहो, त्या दाढीवाल्यानेच तुमची गाडी खड्ड्यात घातली; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव...

CM Shinde: अहो, त्या दाढीवाल्यानेच तुमची गाडी खड्ड्यात घातली; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Subscribe

धाराशीव येथे शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

धाराशीव: धाराशीव येथे शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा दुकान बंद करेन, मात्र यांनी तर काँग्रेससोबत हात मिळवली केली. आज त्यांच्या कार्यकर्त्यांना गाढायची भाषा करत आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली. नियती तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही जे पेराल तेच उगवणार. अहो, या दाढीवाल्यानेच तुमची गाडी खड्ड्यात घातली, असं शिंदे म्हणाले. (CM Shinde Hey that bearded guy put your car in a ditch Chief Minister Shinde s counter attack on Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब असते तर माझी दाढी खेचून मला आणलं असतं. मात्र, या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जागाला माहीत आहे. लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आहे. विधानसभेतही विजय मिळवायचा आहे. कामाला लागलं पाहिजे. जनता आपल्या पाठिशी आहे, घरी बसणारे नकोत, त्यांना तर आधीच घरी बसवलं आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

- Advertisement -

तुमच्याकडे शिवसेना कशी काय?

एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या हातात धनुष्य बाण आहे. प्रभू श्रीरामाचा धनुष्य बाण आपल्याबरोबर आहे. त्यांना त्याची जागा आपण दाखवू. राज्यात प्रत्येकी ठिकाणी लोक येत आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारांच्या मागे आहेत. ते त्यांच्या बाजूने नाहीत. तुमच्याकडे माणसेच नाहीत तर तुमच्याकडे शिवसेना कशी? रडगाणे रोज आहे हे चोरले ते चोरले, यांना विचार नको, यांना स्वार्थ साधायचा होता फक्त. एका मिनिटांत शिवसैनिकांच्या खात्यातील पन्नास कोटी त्यांनी घेतले. परवा त्यांना तर देशाच्या पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं. फेसबुक लाइव्ह वरील प्रधानमंत्री. सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतल्यावर यांना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे कळणार? कुठे फेडायचे हे पाप? अशी विचारणा त्यांनी केली.

(हेही वाचा: Legislative Council Election : विधान परिषदेच्या 21 जागा होणार रिक्त; जूनमध्ये 15 जागांसाठी निवडणूक? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -