घरमहाराष्ट्रराज्यपाल, मुख्यमंत्र्यांचा जुहू समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभाग

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचा जुहू समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभाग

Subscribe

 

मुंबई: मुंबईतील जी-२० परिषदेच्या पर्यावरण कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर जुहू समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला
तसेच, केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमीत साटम, केंद्रीय पर्यावरण सचिव निलानंदन, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, राज्याचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,
पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगट बैठकीसाठी आलेले विविध देशांचे प्रतिनिधी आदींसह नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून समुद्र किनारी स्वच्छता केली.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, सहायक आयुक्त (के/पश्चिम) डॉ. पृथ्वीराज चौहान आणि सर्व संबंधित अधिकारी यांनी मोहिमेचे आयोजन केले होते. याप्रसंगी, राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी हिंदी भाषेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेत, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंग्रजी भाषेत पर्यावरण संवर्धन तसेच सागरी स्वच्छतेची उपस्थितांना शपथ दिली.

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारत भूषवत आहे. याअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये विविध विषयांवर बैठकांचे आयोजन आहेत. २१ ते २३ मे दरम्यान मुंबईमध्ये पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची (ईसीएसडब्ल्यूजी) बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर जुहू समुद्रकिनारी भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

विश्व स्वच्छ ठेवण्याचा संदेश जगाला देवू : मुख्यमंत्री
स्वच्छता हे फार महत्त्वाचे कार्य आहे. संत ज्ञानेश्वर यांनी धरतीच्या कल्याणाचा संदेश दिला होता. आज याक्षणी आपणही संपूर्ण विश्व स्वच्छ ठेवण्याचा संदेश जगाला देवू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
तसेच, राज्य सरकार पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळणे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी, केंद्र सरकारने सागरी स्वच्छतेच्या उद्देशाने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ८० शाळांचा सहभाग असल्याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -