घरमहाराष्ट्रस्ट्रॉबेरी बघून शेती होते का?; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Subscribe

 

साताराः स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?, काय चाललंय काही कळत नाही?, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. सातारा येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मेमिक्री करुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, काही झालं की मुख्यमंत्री शिंदे साताऱ्याला येतात. शेतातील झाडं बघायची अशी शेती होते का?, अरे काय चाललंय? मुख्यमंत्री शिंदे साताऱ्याला गेले की त्यांच्या ऑफिसमधून सांगितलं जातं की ते फाईली बघायला गेले आहेत. तीन दिवसांत फक्त मुख्यमंत्र्यांनी ६५ फाईल्स काढल्या. आम्ही दोन ते तीन तासांत ६५ फाइल्स काढतो. सध्या मंत्रालयात तीन हजार फाईली पडून आहेत. ही त्यांची अवस्था आहे, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

आज मंत्री तर अक्षरश: कुणालाच विचारत नाहीत. मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं बाजारात फिरतायत. खालच्या पातळीचे शब्द हे मंत्र्यांकडून वापरले जातात. महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करण्याचं काम हे राज्यपालांसह राज्यकर्त्यांनी केलं. कुणीही त्यांना आवरलं नाही. आपण मोर्चे काढत आंदोलनं देखील केली. यापूर्वी असं कधी घडलं होतं का?, परंतु यांच्या काळात या सर्व गोष्टी घडल्या, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. काही मुद्दे कळीचे ठरत आहेत. बारसू प्रकल्पाचा मुद्दा चिघळत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात प्रचाराला गेले आहेत. त्यांना कोण ओळखत कर्नाटकात?, महाराष्ट्रात त्यांना कोण ओळखत नाही. तेथे त्यांना कोण ओळखणार आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे भ्रष्टाचारी आहे. बदल्यांसाठी त्यांचा रेट ठरला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. येथे मनगट तोडण्याचे काम सुरू आहे. अशी परिस्थिती येथे असेल तर सरकार काय झोपा काढतंय का?. कोरेगावमध्ये पोलीस निरीक्षक पदी यायला कोणी अधिकारी तयार होत नाही, असे चित्र आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो. तेव्हा असे घडत नव्हते. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -