Eco friendly bappa Competition
घर दिवाळी 2022 मुख्यमंत्र्यांच्या संघ मुख्यालय भेटीवरून राऊत आणि शेलारांमध्ये टि्वटरवॉर

मुख्यमंत्र्यांच्या संघ मुख्यालय भेटीवरून राऊत आणि शेलारांमध्ये टि्वटरवॉर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरमधील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावरून आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये टि्वटर वॉर सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरमधील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावरून आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये टि्वटर वॉर सुरू झाले आहे.

- Advertisement -

शिंदेंनी संघ मुख्यालयाला भेट दिल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेना लक्ष्य केलं . रेशीम बागेत जाऊन आलात त्याबद्दल आनंद आहे. पण या वास्तूसोबत स्वयंसेवक एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधी संघाचे कार्यालय हडप करण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे संघाकडून निष्ठा काय असते ते शिकून घेतले असते तर बरे झाले असते असा टोलाही राऊत यांनी शिंदेना हाणला आहे.


यावर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राऊतांवर कडाडून टिका केली आहे. संजय राऊतांनी सकाळी हिरवी उलटी केली . य़ाकुबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना मळमळ , जळजळ होणारच. दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके… अशा शब्दात शेलारांनी रावतांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

येथे वेगळीच उर्जा आहे- शिंदे

तर एकीकडे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू असताना शिंदे यांनी मात्र संघाच्या मुख्यालय आणि हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की भेट दिल्यानंतर खूप छान वाटलं . येथे वेगळीच उर्जा आहे. मी लहान असाना संघाच्या शाखेत गेलो होतो. शिवसेना आणि भाजपची युती आहे. यामुळे यात काही राजकारण नसल्याचे शिंदे .यांनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -