घरताज्या घडामोडीगाडीमध्ये घुसला पत्रा, पण आजी-आजोबा सुखरूप; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

गाडीमध्ये घुसला पत्रा, पण आजी-आजोबा सुखरूप; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

Subscribe

मुंबई-पुणे महामार्गावरील एका अपघातात लोखंडी कठड्याचा भलामोठा पत्रा कारमध्ये घुसल्याची धक्कादयक घटना घडली. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या कारला शनिवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सोमाटणे फाट्याजवळ अपघात झाला.

मुंबई-पुणे महामार्गावरील एका अपघातात लोखंडी कठड्याचा भलामोठा पत्रा कारमध्ये घुसल्याची धक्कादयक घटना घडली. मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या कारला शनिवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सोमाटणे फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातावेळी गाडीमध्ये आजी-आजोबा आणि त्यांचा मुलगा होता. अपघातानंतर गाडीतील आजी-आजोबांनी आरडोओरड केला. परंतु, कोणच थांबत नव्हते. अखेर मुंबईहून पुण्याकडे निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ‘ओसएसडी डॉ. राहुल गेठे रस्त्यावर थांबले आणि त्यांनी पोलीस आणि अन्य यंत्रणेला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर गाडीची दारं कापून पाच मिनिटांत आजी-आजोबांना बाहेर काढले. (Cm Shindes Osd Rushes To Help Saved The Lives Of Grandparents Mumbai Pune Expressway Accident)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या एका गाडीला शनिवारी दुपारी 3:15 वाजताच्या सुमारास सोमाटणे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, सुसाट आलेली गाडी रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुजाकाचा भलामोठा पत्रा काचेतून मागील बाजुला बसलेल्या आजी-आजोबांपर्यंत गेला. पत्रा गाडीत शिरल्याने गाडी लॉक झाली. तसेच, गाडीचा ड्रायव्हरही बाहेर फेकला गेला.

या अपघातानंतर गाडीतील आजी-आजोबांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. पण कोणच मदतीसाठी थांबायला तयार नव्हते. अखेर मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेले डॉ. गेठे यांनी अपघात पहिला आणि आपली गाडी थांबवली. डॉ. गेठे यांनी गाडीतील आजी-आजोबांना बाहेर काढण्यासाठी स्वतः धडपड केली. परंतु, गाडी लॉक झाल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

- Advertisement -

अखेर डॉ. गेठे यांनी आपत्कालीन यंत्रणा बोलावून कारचे दरवाजे कापले आणि आजी-आजोबांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या अपघाताने घाबरलेल्या आजी-आजोबांना डॉ. गेठे यांनी जागेवर उपचार केले. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधून तिघांना पवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या तिघांवर तातडीने आणि योग्य उपचार होतील यासाठी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्यानंतरच डॉ. गेठे निघून आले. यावेळी दौऱ्यात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिघांवर मोफत उपचाराचा आदेश दिला.

कोण आहेत डॉ. राहुल गेठे?

  • डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) आहेत.
  • डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मानले जातात.
  • मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत.
  • मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील डॉ. गेठे हे विश्वासू सहकारी आहेत.

हेही वाचा – काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली सत्यजीत तांबेंच्या चौकशीची मागणी; नेमका वाद काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -