घरमहाराष्ट्रनैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - अनिल परब

नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – अनिल परब

Subscribe

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नैतिकता बाकी असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षावरील प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी करत हे प्रकरणा सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार आणि नेते अनिल परब आणि शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे हे दिल्लीला गेले होते. दरम्यान, आलेल्या निकालावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नैतिकता बाकी असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. (Anil Parab says CM should resign if there is morality)

हेही वाचा – १६ आमदारांच्या पात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे; पाच न्यायाधीशांचे एकमत

- Advertisement -

राज्यातील सरकारला जराही धोका नाही, असे मत राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देत अनिल परब म्हणाले की, राहुल शेवाळे काय बोलतात, याला मी जास्त महत्त्व देत नाही. सुप्रीम कोर्टाचे जज काय बोलतात, याला मी महत्त्व देतो. सुप्रीम कोर्टाने त्यांना अवघा 15 दिवसांचा दिलासा आहे. कोर्टाने सांगितले की उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राजीनामा दिला म्हणून जे आता जसे आहे तसेच आहे. पण त्यांची त्यावेळची कृती ही अयोग्य होती, असे कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे कोर्टाच्या जजमेंटची प्रत मिळाल्यानंतर ती विधानसभा अध्यक्षांकडे नेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती करणार असल्याचे अनिल परब यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाचे सर्व पुरावे हे उपलब्ध आहेत. ते सर्व पुरावे अध्यक्षांच्या समोर आहेत. त्यामुळे ते पुरावे तपासून अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर व्हिप सुनिल प्रभू यांचा आहे, त्यामुळे त्याबाबत पुन्हा पुन्हा आपले निर्णय घेत बसण्याती किंवा आपले डोचके लावण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश स्पष्ट आहे. त्यामुळे आता या सरकारला जायचं आहे, यांनी आपला बोजाबिस्तारा बंद करावा आणि जायची तयारी करावी. तसेच जर का मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता बाकी असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून ताबडतोब निर्णय द्यावा. या सरकारला कोर्टाने बाहेर काढण्याआधी त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा, असे अनिल परब यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -