घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या खोलीत ठरलेली गोष्ट बाहेर तुम्ही नाकारता, हेच तुम्ही हिंदुत्व ? -...

बाळासाहेबांच्या खोलीत ठरलेली गोष्ट बाहेर तुम्ही नाकारता, हेच तुम्ही हिंदुत्व ? – उद्धव ठाकरे

Subscribe

बाळासाहेबांची वेळोवेळी आठवण काढली म्हणून मी तुमचा आभारी आहे. पण बाळासाहेबांच्या मुद्द्यावर विरोधकांना हिंदुत्वाची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना करून दिली. बाबरी पाडल्यानंतर एरे गबाळे पळून गेले, पण तिथे फक्त बाळासाहेबच फक्त उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. पण आता राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्य़ाठिकाणी राम मंदिर बांधण्यात येणार आहे. या राममंदिरासाठीचा पैसा जनतेने दिला आहे. पण आमच नाव यायला हवे असा हट्ट होत आहे. बाळासाहेबांची सत्ता नव्हती पण काश्मिरी पंडितांना स्थान आणि रोजीरोटी मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांचे प्रयत्न होते. काश्मीर हिंदू पंडित निर्वासित झालेले असतानाच त्याठिकाणीच तुम्ही सत्तेमध्ये फुटीरतावाद्यांना आणि अफझल गुरूचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात असे सांगत त्यांनी भाजपवर तोफ डागली. निर्वासित झालेल्या काश्मिरी पंडितांना किती घरे दिली असे सांगावे असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. सभागृहात निर्लज्जपणाने हा शब्द वापरतो आहे. निर्लज्जपणाने हा शब्द मी वापरतो आहे कारण बाळासाहेबांच्या खोलीत झालेली महाराष्ट्रासाठीची आत ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर पडून नाकारता हे तुमच हिंदुत्व आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेबांची ती खोली आमच्यासाठी मंदिर होती. २०१४ मध्ये युती तुम्हीच तोडली. आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आताही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून मरणार.

शर्जील उस्मानीला शोधायला कधी जाणार

शर्जील उस्मानी युपीतील घाण आहे, आमच्याकडची नाही असे सांगतानाच विरोधक आता शर्जील उस्मानीला शोधण्यासाठी पाताळात कधी जाणार ? राम मंदिर जरी उत्तर प्रदेशात होत असले तरीही देशद्रोही पिळावळ युपीत वाढते आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी युपीने आम्हाला मदत करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्याठिकाणी राम मंदिर होत आहे, त्याठिकाणचा पाया ठिसूळ असलेले राम मंदिर बांधत आहेत असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -