घरमहाराष्ट्रनार्वेकरांच्या मार्फत ठाकरेंचा फडणवीसांना निरोप अन् आजी-माजी मुख्यमंत्र्यांची कोल्हापूरच्या शाहुपुरीत भेट

नार्वेकरांच्या मार्फत ठाकरेंचा फडणवीसांना निरोप अन् आजी-माजी मुख्यमंत्र्यांची कोल्हापूरच्या शाहुपुरीत भेट

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त कोल्हापूरची पाहणी करत आहेत. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोल्हापुरात आहेत. दरम्यान, कोल्हापुरातील शाहुपुरी चौकात हे दोन्ही नेते भेटले. या भेटीमागची स्टोरी आता समोर आली आहे. दोन नेते एकत्र भेटल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मधील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील पहाणी करत असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना निरोप दिला की देवेंद्र फडणवीस यांना मी तीथेच भेटतो. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निरोप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट करून दिली. या भेटीत फक्त पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

- Advertisement -

फडणवीसांनी काय सांगितलं मुख्यमंत्र्यांना?

कोल्हापुरातील शाहुपुरीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची काही मिनिटांसाठीच भेट झाली. या भेटीच्या वेळेस फडणवीसांसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते तर मुख्यमंत्र्यांसोबत शिसेनेचे स्थानिक आमदार, तसंच ग्रामविकास मंत्री मुश्रिफही होते. दोन नेत्यांची जी भेट झाली त्यात नेमकं फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं याची सर्वांना उत्सुकता लागली. नंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी त्याचा खुलासा केला. ते म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी जर बैठक बोलवली तर आम्ही त्या बैठकीला हजर राहु असं मी त्यांना कळवलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -