ठाकरे बंधूंचे लता दीदींचे कनेक्शन

जगभरात आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या लता मंगेशकरयांचा आज वाढदिवस आहे. आज त्या ९२ वर्षांच्या झाल्या आहेत. लता दीदी, त्यांचे चाहते आणि बॉलिवूडसाठी आजचा दिवस खूप खास आहे. लतादीदींनी जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ संगीतक्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे. लता दीदींना आजवर २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. या सर्व चाहत्यांसह राजकारणातील काही मंडळींनी देखील लता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये विशेष शुभेच्छा ठाकरे बंधुंनी देखील दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून लता मंगेशकरांचे अभीष्टचिंतन केले आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गायनकलेच्या देव्हाऱ्यातील साक्षात स्वरसरस्वतीचा वाढदिवस असे म्हणून दिल्या भरभरून शुभेच्छा!

दैवी आणि निसर्गदत्त स्वरांची एक सदाबहार सुरेल कहाणी

आपलं समग्र जीवन म्हणजे दैवी आणि निसर्गदत्त स्वरांची एक सदाबहार सुरेल कहाणीच…जगाच्या कानाकोपऱ्यात विसावलेल्या प्रत्येक हिंदुस्थानी माणसांवर स्वराचं अनिभिषिक्त अधिराज्य गाजवणारा हा स्वर महाराष्ट्राचा आहे. हे आमचं महाभाग्यच! आपला आणि ठाकरे परिवाराचा स्नेह तर मी लहान असताना पासून पाहत आलोय….आपल्या कोकीळकंठी आवाजाचा गोडवा दशकानुदशके देशवासियांच्या मनात रूंजू घालयत आलाय… ्असे म्हणून गायनकलेच्या देव्हाऱ्यातील साक्षात स्वरसरस्वतीचा वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

दिदींचा आवाज म्हणजे निखळ सूर

लतादीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीयांची स्वप्नं-आशाआकांक्षा यांचे प्रतीक आहे. म्हणूनच तर त्यांच्या आवाजाला वय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे कोणतेही शिक्के नाहीत. दीदींचा आवाज म्हणजे एक निखळ सूर आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे अभीष्टचिंतन केले.

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींचं अभिष्टचिंतन केले आहे. राजकीय नेतेही यास अपवाद नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता दीदींना शुभेच्छा देताना एक खास पोस्ट लिहित लतादीदींच्या आवाजाचे तोंडभरून कौतुकही केले आहे.

सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘१९४२ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा अवघा भारत ब्रिटिशांना उद्देशून ‘भारत छोडो’चा नारा देत होता, तेव्हा एका १३ वर्षीय मुलीनं भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुढची अनेक दशकं या जादुई आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनोजगतावर अधिराज्य केलं. त्या गायिकेचं नाव लता मंगेशकर! आपल्या सर्वांच्या लतादीदी. दीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीयांची स्वप्नं-आशाआकांक्षा यांचे प्रतीक आहे. म्हणूनच तर त्यांच्या आवाजाला वय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे कोणतेही शिक्के नाहीत. दीदींचा आवाज म्हणजे एक निखळ सूर आहे, ज्याचा जन्म जरी वेदनेतून झाला असला तरी त्यात आत्मा आणि परमात्मा यांच्या अद्वैताचा साक्षात्कार आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.