घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री आता आमदार होणार; विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ठाकरे, गोऱ्हे उमेदवार

मुख्यमंत्री आता आमदार होणार; विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ठाकरे, गोऱ्हे उमेदवार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीला खो बसल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार २१ मे रोजी ही निवडणूक होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या रिक्त जागांसाठी शिवसेनेकडून आता दोन जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून नाव जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते विधीमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे २०२० पुर्वी आमदार होणे क्रमप्राप्त होते. अन्यथा महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला असता. ही घटनात्मक कोंडी सोडविण्यासाठी २४ एप्रिल रोजी रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.

- Advertisement -

शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहेत. तर प्रहार पक्षाच्या दोन आमदारांसहीत अनेक अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. विधानपरिषदेची एक जागा निवडून आणण्यासाठी विधानसभेतील २९ आमदारांची मते आवश्यक आहेत. त्यामुळे विधानसभेतील सध्याच्या संख्येनुसार शिवसेना या दोन जागा अगदी सहज निवडून आणू शकणार आहे.

विधानसभेतील एकूण पक्षीय बलाबल पाहीले तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सहज निवडून आणता येणार आहे. तर भाजपकडे १०५ आमदारांसहीत अपक्षांचा पाठींबा असल्यामुळे ते चार जागा सहज निवडून आणू शकतात. बहुमत सिद्ध करताना मनसेसहीत इतर चार आमदार तटस्थ राहिले होते. त्यामुळे या निवडणूकत ते काय भूमिका घेतात, याकडेही २१ मे रोजी लक्ष राहणार आहे. मात्र ९ जागांसाठी ९ उमेदवारांचे अर्ज आल्यास ही निवडणूक बिनविरोध जाहीर होईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -