घरताज्या घडामोडीतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अन् उद्धव ठाकरेंमध्ये रविवारी भेट, भेटीविषयी राजकीय...

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अन् उद्धव ठाकरेंमध्ये रविवारी भेट, भेटीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Subscribe

भाजपला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे अन्यथा देशाचे आणखी नुकसान होईल, असे वक्तव्य चंद्रशेखर राव यांनी नुकतेच केले होते. त्यासाठी सर्व बिगर भाजप राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दर्शविला होता.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून यादरम्यान ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बिगर भाजप मुख्यमंत्र्यांनी एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या आवाहनानंतर ही भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्व आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी एकत्र भोजन घेणार आहेत. दोघांची भेट ‘वर्षा’ निवासस्थान किंवा ‘सह्याद्री’ या अतिथीगृहात होण्याची शक्यता असली तरी भेटीचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नाही. ठाकरे यांच्या निमंत्रणावरून ही भेट होणार असल्याचे तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या संघराज्य विषयक धोरणांना विरोध करण्यासाठी बिगर भाजप मुख्यमंत्री एकत्र येणे हा या व्यूहरचनेचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे अन्यथा देशाचे आणखी नुकसान होईल, असे वक्तव्य चंद्रशेखर राव यांनी नुकतेच केले होते. त्यासाठी सर्व बिगर भाजप राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दर्शविला होता.


हेही वाचा : Maharashtra New DGP : रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; पांडे मूळ पदावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -