कठोर निर्णय घ्यावे लागतील मात्र कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मदतीच्या बाबत सर्व अंदाज सुरु आहे की, किती नुकसान झाले आहे तो तर विचार सुरुच आहे. पण काही ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा काढायला लागेल

CM Uddhav Thackeray assured to sangli bhilwadi people Tough decisions will have to be taken but no one will be left in help
कठोर निर्णय घ्यावे लागतील मात्र कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असून सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. पूरग्रस्त नागरिकांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे. सांगलीच्या भिलवडी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून भिलवडीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन दिलं आहे. तसेच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील मात्र त्याला तुमची तयारी असली पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या भिलवडी येथे नागरिकांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचं सकट अजूनही कायम आहे. त्या संकटाचा विचार केला तर अशी गर्दी करुन काही उपयोग नाही. सगळ्या तुमच्या वेदना आमच्यापर्यंत पोहचल्या आहेत. ज्यावेळी संकट कोसळणार असा अंदाज आला तेव्हापासून सरकार कामाला लागले, जिथे जिथे शक्य तेथिल नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले या पट्ट्यात ४ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले. कोणतीही जिवितहानी होऊ नये हाच प्राधान्यक्रम होता आणि तो राहणार आहे. तो साधत असताना घरे सोडून जावे लागले हा आनंदाचा मुद्दा नाही.

राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले की, पूर कुठपर्यंत आला होता. ज्याच्यामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसले काही घरे अशीही आहेत की नागरिकांचे स्थलांतर झाले. घरामध्ये पाणी गेले नाही तरी आर्थिक नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान झालं आहे.

तळीयेगाव अंगावर शहारा येईल असे नागरिक सांगत होते. असे संकट आणि त्याची मालिका आपल्यावर कोसळली आहे. यातून मी मार्ग काढणारच मात्र आपल्याला नम्र विनंती आहे. ती म्हणजे तात्काळ मदतीबाबत सर्व सुरु आहे. या मदतीच्या बाबत सर्व अंदाज सुरु आहे की, किती नुकसान झाले आहे तो तर विचार सुरुच आहे. पण काही ठिकाणी कायमस्वरुपी तोडगा काढायला लागेल याची तयारी आहे का? काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील पुनर्वसनाची तयारी तुमचीही असली पाहिजे.

२००५ मध्ये एवढे पाणी चढले, २०१९ मध्ये एवढे पाणी चढले आणि २०२१ मध्ये एवढे पाणी चढले ह्या पाण्याच्या पातळ्या मोजत बसायचे नाही. दरवर्षी मदत करायची त्यातच आपला संसार उभा करायचा आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याहून मोठ्या संकटाला समोरे जायचे आणि पुन्हा आपल्याच जिल्ह्यात काही दिवस निर्वसाहत जगणार असं आयुष्य आपल्याला नको यामुळे सरकार म्हणून तुमच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.