धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू…

cm uddhav thackeray avoided the end of Dharmaveer movie which is Anand Dighe's death
धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट पाहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. परंतु या चित्रपटाचा शेवट पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं, आनंद दिघे यांचा अपघात झाल्यावर त्यांच्यावर सिघानिया रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येते. उपचार घेतानाचा भाग मुख्यमंत्र्यांनी पाहिला नाही. चित्रपटाचा शेवटचा भाग पाहू शकलो नाही. आनंद दिघेंचा मृत्यू हा शिवसेना आणि ठाण्यासाठी आघात होता असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी धर्मवीर चित्रपट पाहिला. यावेळी शिवसेनेच्या मोजक्याच नेत्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री ठाकरे यांचे चित्रपट गृहात स्वागत करण्यात आले. चित्रपटाला सुरुवात झाली आणि शेवटी जेव्हा आनंद दिघेंच्या अपघाताचे क्षण दाखवण्यात येतात. त्यापूर्वी मुख्यमंत्री चित्रपटगृहातून बाहेर पडले. आनंद दिघे यांच्यावरील उपचार आणि त्यांचा उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. असा दुःखद प्रसंग चित्रपटातसुद्धा दाखवण्यात आला आहे. परंतु हा प्रसंग पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चित्रपट आर्धा सोडला असल्यामुळे चर्चा सुरु झाली.

आनंद दिघेंचा मृत्यू आघात – मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट गृहातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. कारण त्यावेळी आमच्यावर तो आघात होता. व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिलेले आहेत अशी प्रतिक्रिया दिली. तसेच दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणारे आनंद दिघे प्रसाद ओक यांनी जिवंत केले. उत्तम भूमिका केली. कुठेच जाणवले नाही मी चित्रपट पाहतो आहे. सर्वांनी हा चित्रपट पहावा असे मुख्यमंत्री म्हणाले. आयुष्य जगावं कसं हे आपण या चित्रपटातून शिकले पाहिजे. प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. त्यामुळे माता भगिनींचे रक्षण होईल. एक शिवसैनिक कसा असावा, यासाठी चित्रपट पहावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निष्ठा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, स्वतःचं आयुष्य झोकून देऊन कसं जगायचं हे तुम्ही चित्रपट पाहिल्यावर कळेल. चित्रपटाचा खरा भाग आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे. म्हणून शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचं नातं दाखवलेलं आहे, मी म्हणेन त्याच्याही पेक्षा घट्ट होतं. असे शिवसैनिक मला लाभले, एकनाथ शिंदे आहेत, राजन विचारे आहेत. हे सगळे शिवसैनिक आनंद दिघेंच्या मुशीतून तयार झालेले आहेत. धर्मनिष्ठा, संघटना आणि आपली जनता यावरती निस्सीम प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा : …म्हणून आनंद दिघेंवर बाळासाहेब चिडायचे, उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण