घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याच्या कंपनीत २९ कोटी रुपये मनी लाँड्रिंगने आले; सोमय्यांचा आरोप

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याच्या कंपनीत २९ कोटी रुपये मनी लाँड्रिंगने आले; सोमय्यांचा आरोप

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे पैसे आले असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. शिवाजी पार्कच्या इथे कोट्यवधीची इमारत उभी केली आहे. या कंपनीत २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये मनी लाँड्रिंग होऊन आले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.

या श्रीजी कंपनीला तुम्ही ओळखता का, उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, असं सोमय्या म्हणाले. श्रीजी कंपनीचा कार्यालय वांद्राे इथे आहे. या कंपनीला चालवणारे श्रीधर पाटणकर आहे. या कंपनीत श्रीधर पाटणकर भागिदारी आहे. दोन एन्ट्री झाल्या आहेत. एक ५ कोटी ८६ लाख ८० हजार ९०२ रुपये आणि दुसरी २३ कोटी ७५ लाख ४८ हजार ४१८ रुपये अशा एन्ट्री झाल्या आहेत. श्रीजी होम्स शिवाजी पार्कमधील कॅटरिग कॉलेजच्या समोर इमारत बांधली, असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवलंय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्ध वठाकरे यांना माझी विनंती आहे जो हवाला किंग नंदकिशोर यांला आपण कुठे लपवलं आहे, त्याची माहिती जनतेला द्यावी. व्यावसायिक पार्टनर, मनी लाँड्रिंगचे सहकारी नंदकिशोर कुठे आहेत याची माहिती द्या, असं सोमय्या म्हणाले.

आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मेहूणे श्रीधर पाटणकर त्यांच्याबरोबर नंदकिशोर सोबत अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. तपास यंत्रणांच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते शोधतायत नंदकिशोर गायब आहेत. नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करा अशी आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

नंदकिशोरला फरार घोषित करणार

ज्याने करोडो रुपये मनी लाँड्रिंगचा पैसा पार करण्यात मदत केली. दीड डझनहून अधिक कंपन्यांना पेनिस स्टॉक कंसेप्टचा मनी लाँड्रिंगसाठी उपयोग करुन दिला. ते हातात येत नाहीत. मला विश्वास आहे पुढील काही दिवसात, आयकर, ईडी हे नंदकिशोरला फरार घोषित करणार. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट न्यायालयातून मिळणार असा विश्वास आहे, असं सोमय्या म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -