घरताज्या घडामोडीमाझे १७० मोहरे फोडून दाखवा, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान

माझे १७० मोहरे फोडून दाखवा, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान

Subscribe

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. यावेळी माझे १७० मोहरे फोडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केलं आहे.

माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा

महाराष्ट्र सरकार पडणार नाही. आपले १७० आमदार आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. परंतु माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी विरोधकांना केलं आहे. तसेच ते तुमची गुलामगिरी करणार नाहीत, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

धाडी टाकून नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न

सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं, ते पिलू वळवळ करत होतं, आता फुत्कारत आहे, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. दहशतवादी म्हणून दाऊदला ओरडणाऱ्या दहशतावाद्याला विरोधकांनी पकडून दाखवा. तसेच नको तिथे धाडी टाकून नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, हे आता खपवून घेतलं जाणार नाही. कुठल्याही त्रासाचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आपल्या पाठीच्या आजारपणामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते. आजच्या चहापानाला देखील ते उपस्थित नव्हते. परंतु अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी बैठकीतून त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आणि शिवसेनेच्या आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे उद्याचं अधिवेशन वादळी ठरणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : असंघटीत कामगारांच्या न्यायासाठी पुण्यात आंदोलन – उदित राज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -