घरCORONA UPDATEपुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही - उद्धव ठाकरे

पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘जर लॉकडाऊन उघडल्यानंतर परिस्थिती बिघडली, तर पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल’, असं विधान केलं होतं. मात्र, त्यामुळे लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा संभ्रम टाळण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्यावर स्पष्टीकरण देणारं ट्वीट केलं आहे. ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही’, असं या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात नवा लॉकडाऊन लागू झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, परिस्थिती बिघडली, तर मात्र नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असं मात्र त्यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की,’राज्यात पुन्हा लॉकडाऊ जाहीर केलेलं नाही. त्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की कुठेही गर्दी करू नका आणि शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या’. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं आहे. हे मुख्यमंत्री कार्यालयाचं आत्ताचं ट्वीट…

- Advertisement -

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्रिमंडळातील इतर काही मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली होती. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो, या चर्चांविषयी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणाले होते, ‘नियम शिथिल केल्यानंतर गर्दी व्हायला लागली आहे. मॉर्निंग वॉकसाठीही लोकं गर्दी करायला लागले आहेत. त्यामुळे जर हे पाऊल जीवघेणं ठरायला लागलं, तर मात्र नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल’, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. या विधानावरून राज्यात आत्ताच पुन्हा नव्याने लॉकडाऊन लागू केलाय की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. हे मुख्यमंत्री कार्यालयाचं आधीचं ट्वीट…

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -