घरमहाराष्ट्रCM Uddhav Thackeray Discharge: यावेळी राज नव्हे तर खुद्द आदित्य ठाकरे बनले...

CM Uddhav Thackeray Discharge: यावेळी राज नव्हे तर खुद्द आदित्य ठाकरे बनले उद्धव ठाकरेंचे सारथी

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २२ दिवसानंतर दक्षिण मुंबईतील एचआर रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उद्धव ठाकरे यांना त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत वर्षावर नेलं. खरं तर आदित्य ठाकरे यांच्या जागी मनसे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे गाडी चालवताना दिसतील असा कयास अनेकांनी बांधला होता. याचं कारण म्हणजे २०१२ साली जेव्हा उद्धव ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणलं होतं. मात्र, यावेळी राज यांची जागा घेतली ती उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी.

महाराष्ट्राला १६ जुलै २०१२ साली एक अनपेक्षित असं चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांना छातीत दुखत असल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर जेव्हा त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा राज ठाकरे त्यांचे सारथी बनले. राज हे उद्धव यांना सोडण्यासाठी स्वत: गाडी चालवायला स्टिअरिंग हाती घेऊन बसले. टी-शर्ट घातलेले उद्धव आणि पांढ-या कुर्त्यातले राज यांची हॉस्पिटलमधून बाहेर पडत, स्मित करत ‘मर्सडिज’मध्ये बसतानाची दृष्य आणि फोटो माध्यमांमधून पुढच्या काही क्षणांमध्ये महाराष्ट्रभर पसरली.

- Advertisement -

खरंतर उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा आपल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी अलिबागला निघाले होते. तेव्हा त्यांना बाळासाहेबांनी फोन करुन राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा लगेच मागे फिरवला आणि मुंबईकडे तातडीनं निघाले होते.

दरम्यान, रुग्णालयातून जेव्हा उद्धव ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला होता, तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर घेऊन गेले. राज उद्धव यांना घेऊन ‘मातोश्री’ला पोहोचेपर्यंत शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राज आणि उद्धव मतभेद टाळून परत एकत्र येतील ही तेव्हा अजूनही ताजी आणि गरम चर्चा दोन्ही पक्षाच्या सैनिकांमध्ये आणि लोकांमध्येही होती. याशिवाय, राज ठाकरे देखील बऱ्याच काळानंतर मातोश्रीवर गेले होते.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी यासंदर्भात २०१४ मध्ये ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात रजत शर्मांशी बोलताना भाष्य केलं. “राजकारण एक असतं आणि कौटुंबिक संबंध एका बाजूला असतात. मी त्याच त्याच गोष्टी परत सांगत बसत नाही, पण उद्धव ठाकरेंना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं तेव्हा मला असं आतून वाटलं की आपण तिथं असायला हवं. माझ्या मनात क्षणभरासाठीही असं आलं नाही की याची काय चर्चा होईल, राजकीय परिणाम काय होतील वगैरे. माझ्या मनात आलं आणि मी तिथे उभा राहिलो,” असं राज ठाकरे म्हणाले होते.

यावेळी देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे सारथी बनतील अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या जागी यावेळेस आदित्य ठाकरे दिसले.


हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -