घरमहाराष्ट्रशिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावूक

शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावूक

Subscribe

उद्वव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्री या त्यांच्या स्वगृही परतले आहेत. यामुळे समस्त शिवसैनिक व्यथित झाले असून बंडखोर आमदारांविऱोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर उद्वव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला.

बंडखोरी हा भाजपाचाच डाव असल्याचा आरोप यावेळी ठाकरे यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी कोरोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरू झाला. असे सांगत कोणत्या वेळी कोण तुमच्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवण गरजेच असल्याचेही म्हटलं. तसेच यावेळी मानेवरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतर उ्द्भवलेल्या शारीरीक समस्यांवरही त्यांनी भाष्य केलं. पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण नंतर काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते असेही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी एकनाथ शिंदे गुजरातला गेल्याचे कळाल्यानंतर इतर आमदारांना निवासस्थानी बोलवलं. त्यांनी सोडून जाणार नाही सांगितलं . पण दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊन निघून गेले. याच वाईट वाटत असल्याचं यावेळी ठाकरे म्हणाले. काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असं म्हणाले होते. पण ते गेले .
तसेच हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजववेली मूळं आहेत तोपर्ंयत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. त्यांनी जावं, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही,”असेही उद्धव ठाकरें म्हणाले.
भाजपासोबत जावं यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंड नाही.

- Advertisement -

आपण प्रत्येक वेळी त्यांना महत्वाची खातं दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असतं, पण त्यांना दिलं. संजय राठोड यांचं वनखातं माझ्याकडे घेतलं. साधी खाती मी माझ्याकडे ठेवली. मला आता या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे. स्वत:चा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काही करायचं नाही का?,” अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे समजा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे. “तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं विसरुन जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. बाळासाहेबांसाठी माझ्यापेक्षा शिवसेना लाडकं अपत्य आहे हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा कंठ दाटून आला.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -