‘कोरोनावर मात करून आरोग्याचा गोडवा वाढवूया’ मुख्यमंत्र्यांकडून संक्रांतीच्या शुभेच्छा

पृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. जगावर गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट घोंघावते आहे. यातही आपण संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत पुढे जात आहोत

CM Uddhav Thackeray greetings of Makar Sankranti

नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankranti 2022) संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा उत्साह सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण समारंभ साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या पूर्व संध्येला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray )  यांनी राज्याचील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. (CM Uddhav Thackeray greetings of Makar Sankranti)

‘मकर संक्रांत आपल्याला संक्रमण आणि बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यासाठी आपण परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करूया आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूया’, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्या आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,  ‘पृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. जगावर गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट घोंघावते आहे. यातही आपण संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत पुढे जात आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीकडूनही आपण हाच संदेश घेऊया. परस्परांची काळजी घेऊया. गर्दी टाळूया. एकमेकाला आरोग्यदायी, समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा देऊया. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – makar sankranti special- मकरसंक्राती स्पेशल- तिळगूळाचे लाडू