घरमहाराष्ट्र२५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

२५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Subscribe

मोठ्या प्रमाणावर युवा वर्गाला कोरोना संसर्गापासून रोखणे आवश्यक. ब्रेक दि चेनच्या माध्यमातून उचललेल्या पावलांची देखील दिली माहिती

कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी पत्राद्वारे केली आहे.

मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात म्हटले आहे. मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Image

कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र ठोस पावले उचलत आहेत. राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानीकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, यात जीवनावश्यक वस्तू आणि सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील, अशी कार्य पद्धती ठरवली आहे.

- Advertisement -

Image

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -