घरताज्या घडामोडीतंत्रज्ञानाचा वापर कुणी कशासाठी अन् कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न -...

तंत्रज्ञानाचा वापर कुणी कशासाठी अन् कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

सध्या जसा काळ पुढे सरकतो आहे तसे तंत्रज्ञान देखील पुढे सरकत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कुणी कशासाठी आणि कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

प्रत्येक घरात शिक्षण पोहचविण्याचे सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबांचे स्वप्न पूर्ण होणार असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कुणी कशासाठी आणि कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचा भूमीपूजन सोहळ्याला व्हिसीमार्फत हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना तंत्रज्ञानासह अनेक विषायंवर संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभात संवाद साधताना म्हणाले, सावित्रीबाईंनी पारतंत्र्य आणि समाजावर अंधश्रद्धा, विषमता यांचा पगडा असणाऱ्या काळात मुलींचा शिक्षणाशी काही संबध नसणाऱ्या काळात स्त्री शिक्षणाचा पाया रचला. अशा सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापीठाला दिले आहे. या विद्यापीठाच्या उपकेंद्राची इमारत नाशिक येथे उभी राहत आहे. नाशिक शहराला वेगळी ओळख आहे, या भूमीला मी मंत्रभूमी म्हणतो. अशा या पुण्यभूमीत हे उपकेंद्र साकारण्यात येतय असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न

सध्या जसा काळ पुढे सरकतो आहे तसे तंत्रज्ञान देखील पुढे सरकत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कुणी कशासाठी आणि कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतू आपण लक्षात घेतले पाहिजे की आज मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड माहिती उपलब्ध आहे. पण माहिती आणि ज्ञानात फरक आहे. या माहितीचे जर ज्ञानात रुपांतर करायचे असेल तर आपल्या गुरु लागतो, त्याबरोबर अनुभव लागतो. कारण अनुभव हा सर्वोत्तम गुरु मानला जातो. पण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ शकू असे नाही. म्हणून अनुभव संपन्न आणि ज्ञानसंपन्न गुरुंचे मार्गदर्शन मिळणे हे फार मोठे काम असते असे मुख्यमंत्री म्हणाले.

मी आज तंत्रज्ञानाचा वापर करुन म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालो आहे. त्याचप्रमाणे आपण अशा तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान प्रसारासाठी करायला हवा. आम्ही १५ वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या दूरदृश्य प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व दहावीचे वर्ग मुख्य स्टुडियोसोबत जोडले होते आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले होते.

- Advertisement -

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबांचे स्वप्न पूर्ण होणार

भूमीपूजन होणाऱ्या नाशिक उपकेंद्राचा फायदा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यापीठांची अशी अनेक उपकेंद्र उभे रहायला हवीत. त्यातूनच प्रत्येक घरात शिक्षण पोहचविण्याचे सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभव संपन्न आणि ज्ञानसंपन्न गुरुंचे मार्गदर्शन मिळण्याचे फार मोठे काम या उपकेंद्राच्या माध्यमातून होणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असे काम आज आपल्या हातून होत आहे. जे विद्यार्थी या उपकेंद्रातून मोठे होतील ते देशाचे भावी आधारस्तंभ म्हणून नावारुपास यावेत अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा : भाजपला पुन्हा राज्यसभेसारखं यश मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -