Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निर्भया पथकाचे उद्घाटन

पोलीस दल सक्षम करण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. महिला आणि राज्याचं रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.  पोलीस दलाचे काम किती कठीण आहे, कर्तव्य पार पाडणे किती आव्हानात्मक आहे हे आपण सगळेच जाणतो. तुमचे काम फार महान आहे त्यामुळे कर्तृत्व गाजवणाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळाले, त्यांचे खुप अभिनंदन त्यातून पोलीस दलाला प्रेरणा मिळाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM uddhav thackeray inaugurates Nirbhaya Pathak on the occasion of Republic Day 2022
CM uddhav thackeray inaugurates Nirbhaya Pathak on the occasion of Republic Day 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर निर्भया पथक आणि निर्भया सक्षम केंद्राचे तसेच इतर उपक्रमांचे उदघाट केले. कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नागरिकांना  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक दिल्या. प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून कौतूक करावे असे काम पोलीस दल करत असल्याबद्दल अभिमान वाटतो, आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत.  महिला प्रगतीपथावर घोडदौड करत असतांना समाजातील महिला असहाय्य राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज. महिलांबाबत एखादी घटना घडते, हल्लकल्लोळ माजतो पुन्हा काही काळाने सगळं थंड होतं.अशा घटना घडू नयेत, घडल्या तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा पोलीसांनी सुरु केले याचा अभिमान आहे, असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

पोलीस दल सक्षम करण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. महिला आणि राज्याचं रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.  पोलीस दलाचे काम किती कठीण आहे, कर्तव्य पार पाडणे किती आव्हानात्मक आहे हे आपण सगळेच जाणतो. तुमचे काम फार महान आहे त्यामुळे कर्तृत्व गाजवणाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळाले, त्यांचे खुप अभिनंदन त्यातून पोलीस दलाला प्रेरणा मिळाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त,  झाशीच्या राणीचा आपण उल्लेख करतो पण जगतांना महिलांना पावलोपावली  संरक्षण देतो का, नसू तर मग ही  वृत्ती/ प्रवृत्ती मोडून काढणे हे आपल्या सर्वांचे महत्वाचे काम आहे. आपला महाराष्ट्र साधु संताचा महाराष्ट्र आहे. संस्कार महत्वाचा पाया आहे. जिथे संस्कार उपयोगी पडत नाही तिथे कायद्याचं वचक दाखवणारं आपण पथक आपण आज स्थापन केले त्याबद्दल विशेष अभिनंदन निर्भया सुरक्षितता मार्गदर्शक पुस्तिका जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा.  महाराष्ट्र महिला अत्याचार मुक्त करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. महाराष्ट्र मातृभक्त.  आपला महाराष्ट्र शक्ती पुजक महाराष्ट्र,  महिलांचा रक्षणकर्ता महाराष्ट्र म्हणून देशाला नव्हे तर जगाला महाराष्ट्राची ओळख यातून दिसून येईल असं आपण काम करूया, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पोलीसदलाची मान ऊंचावली – दिलीप वळसे पाटील  

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणातील मुद्दे शौर्य/सेवा/ राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुरस्काराने पोलीसदलाची मान ऊंचावली आहे. पोलीसांच्या एकनिष्ठ सेवेचा अभिमान वाटतो. भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी ही अपेक्षा आहे. आज आपण महिला सुरक्षेचे विविध उपक्रम सुरु केले. यातून महिला सुरक्षिततेचे बळकट पाऊल मुंबई पोलीसांनी टाकले आहे. महाराष्ट्र, मुंबई पोलीसांना गौरवशील परंपरा, त्याचा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नेहमी हातभार लागला आहे. मुंबई पोलीसदलाचे स्कॉटलॅण्ड पोलीसदलाप्रमाणे कौतूक केले जाते, असे गृहमंत्री दिलीप वळसे वाटील यांनी म्हटले.

निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. तक्रार नोंदवून पोलीस योग्य कार्यवाही करत आहेत हे साकीनाका घटनेवरून दिसले. इथे पोलीस प्रतिसाद कालावधी फक्त १० मिनीटांचा होता. अवघ्या १८ दिवसात चार्जशीट दाखल केली.याचपद्धतीने मुंबई पोलीसदलाचे तपास काम सुरु. असे झाल्यास गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. ही बाब चिंताजनक. सार्वजनिक क्षेत्रात अनेक महिला काम करत आहेत. ८० ते ९० टक्के अपराध परस्पर घरगुती संपर्कातून होतात. आणि मग महाराष्ट्रात अत्याचार वाढत असल्याचे चित्र दिसते.  समाज आणि इतर माध्यमातून होणाऱ्या घटनांवर लक्ष दिले पाहिजे. घडणाऱ्या घटनांवर जरब बसावा यासाठी असे काम करण्याची गरज आहे  शक्ती कायदा मंजूर करतांना एकवाक्यता होती. कारण तो कायदा करतांना स्वत:शी आम्ही सर्वजण प्रामाणिक होतो. अशाच पद्धतीने इतरवेळीही काम व्हायला हवे. पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन येणाऱ्या महिलेचे म्हणणे ऐकूनच घेतले पाहिजे, कार्यवाही केली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढणार नाही. मोठ्या घटना घडणार नाहीत, पोलीसांवरचा ताण वाढणार नाही. समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असते. जिथे महिला सुरक्षित नाहीत तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही. महिला सुरक्षा हा तिचा किंवा कुटुंबाचा प्रश्न नाही ती सर्व समाजाची जबाबदारी असून  महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भयमुक्त असावी. महिला अत्याचाराचा निकाल २१ दिवसात लागावा अशी तरतूद शक्ती कायद्यात आहे. विधीमंडळाने हा कायदा मंजूर केला. राज्यपालांच्या स्वाक्षरीने तो लागू होईल, असे गृहमंत्री म्हणाले.

 

महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य – हेमंत नगराळे

 

अर्भक ते वार्धक्य या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भय पथके काम करणार असून  मुंबईतील 91 पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबूक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. निर्भया फेसबूक, निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात येत असल्याची माहिती ही त्यांनी दिली. १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी  माहिती त्यांनी दिली.


हेही वाचा – मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या, चंद्रकांतदादा पाटलांची ठाकरे सरकारवर टीका