Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मास्क न वापरणं यात काय शौर्य?; नाव न घेता राज ठाकरेंना टोला

मास्क न वापरणं यात काय शौर्य?; नाव न घेता राज ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत जनतेला संबोधीत केलं. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष होतं. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. लाईव्ह दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मी मास्क वापरत नाही, असं म्हटलं होतं. यावरुन मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता टोला लगावला. मास्क न वापरणं यात काय शौर्य? असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. काही दिवसांपूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी मास्क न वापरण्याच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांना नमस्कार केला होता.

आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय

- Advertisement -

पहिला जीव वाचवायचा आहे, आज पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय. दोन दिवसात दृश्य परिणाम दिसला नाही, किंवा दुसरा पर्याय मिळाला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागेल. त्यामुळे आता ठरवायला हवं, ही लाट मी रोखेनच पण पुढची लाट येऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सुविधा अपुऱ्या पडतील 

“आज ४५ हजार नवे रुग्ण वाढण्याची शक्यता. आपण कोणत्या दिशेला चाललोय? याच वेगाने जर रुग्णवाढ होत राहिली तर विगलीकरणात सध्या २ लाख २० हजार बेड्स आहेत. त्यापैकी १ लाख ३७ हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे ६५ टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे २०,५१९ आहेत. ते जवळपास ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स २५ टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण लॉकडाऊनचा इशारा; दोन दिवसात निर्णय घेणार – मुख्यमंत्री


 

- Advertisement -