घरमहाराष्ट्रपूररेषेच्या आतील अतिक्रमण हटवणार; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पूररेषेच्या आतील अतिक्रमण हटवणार; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूरची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा सूचक इशारा देत पूररेषेच्या आतील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यामागे अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी नदीपात्रातील अतिक्रमण हे देखील महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. “काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकामं करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा अभ्यास करुन आराखडा निश्चित करावा लागेल. पुरामुळे शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सातत्यानं पूरबाधित असलेल्या नागरिकांचं पुनर्वसन आवश्यक आहे. काही कठोर निर्णय घेतले नाही तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकाम करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -