Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी घेतलेली पंतप्रधान मोदींची भेट ही राजकीय तडजोडीसाठी, उदयनराजेंचा आरोप

उद्धव ठाकरेंनी घेतलेली पंतप्रधान मोदींची भेट ही राजकीय तडजोडीसाठी, उदयनराजेंचा आरोप

Related Story

- Advertisement -

राज्यात सध्या धुमसत असलेल्या मराठा आरक्षण या विषयांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासह ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा आणि अन्य विविध १२ विषयांवर आजच्या भेटीत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्याचे देखील समोर आले असून यावर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला आहे. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठी होती, असा आरोप उदयनराजेंनी केला आहे. साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीवरून राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. तर आज पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत त्याविषयी माहिती दिली. पंरतु ही भेट उदयनराजेंना काहीशी पटलेली नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलावणे, चर्चा करणे महत्त्वाचे होते. मग मुख्यमंत्र्यांनी तसे का केले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ही भेट केवळ राजकीय हितासाठी असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

या भेटीचा फायदा होईल….

- Advertisement -

दरम्यान, या भेटीविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया देताना आम्हाला ही नेलं असतं तर आनंदच झाला असता अशी इच्छा बोलून दाखवली. यावेळी ते म्हणाले कि, न्यायमूर्ती भोसले यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार आरक्षण पुन्हा मिळवायचं  असेल तर काय करायला पाहिजे हे त्यात नमूद करण्यात आले आहे. या अनुषंगाने राज्याने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून पुढील कार्यवाही केली पाहिजे असे म्हणत आज पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीचा फायदा होईल, असे सूचक वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

- Advertisement -