घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांचे राज्यसभा पराभवानंतर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चिंतन, वर्षा बंगल्यावर खलबतं

मुख्यमंत्र्यांचे राज्यसभा पराभवानंतर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चिंतन, वर्षा बंगल्यावर खलबतं

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवसस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक बोलवले. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राज्यसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्याची शक्यता आहेत.

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्यात आले होते. यापैकी, शिवसेना नेते संजय राऊत यांचा विजय झाला तर दुसरे उमेदवार कोल्हापूरचे जिल्हा प्रमूख संजय पवार यांचा पराभव झाला आहे. भाजपचा उमेदवार जिंकला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील १० अपक्ष आमदारांची मत फुटली आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या नेत्यांसोबत चिंतन सुरु आहे. अपक्ष आमदारांची मत फुटण्यामागे कारण काय? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. (cm uddhav thackeray meeting with shivsena Leader)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवसस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक बोलवले. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राज्यसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्याची शक्यता आहेत. तसेच अधिक संख्याबळ असताना शिवसेनेचा उमेदवार पराभूत कसा झाला? याची कारणे शोधण्याचे काम करण्यात येत आहे. या बैठकीला शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल परब, आणि संजय राऊत उपस्थित आहेत.

- Advertisement -

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. परंतु हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अपक्ष आमदारांनी धोका दिला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये पराभवावर चिंतन सुरु आहे. दरम्यान अपक्ष आमदारांची मत फुटली कशी? यमागील कारणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच अवघ्या ८ दिवसांवर असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीसुद्धा रणनिती आखण्यात येऊ शकते. शिवसेनेला नेमका कुठे दगाफटका बसला आहे. याबाबत मुख्यमंत्री चर्चा आणि माहिती घेऊ शकतात.

- Advertisement -

संजय राऊत – शरद पवार भेट – राऊत

राज्यसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शनिवारी दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होते असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या सहाव्या जागेवरील उमेदवाराच्या पराभवाबाबत चर्चा करण्यात आली. या निवडणुकीमध्ये कुठे दगाफटका झाला? पराभवामागील कारण काय? याबाबत चर्चा केली असून विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही चर्चा केली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. यानंतर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.


हेही वाचा : मुलायमसिंहांचे समर्थन घेताना भाजपच्या ह्रदयातील राम कुठे गेला? सचिन सावंतांचा आशिष शेलारांवर पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -