मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

मुख्यमंत्र्यांनी आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत सकाळी १० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवाई संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थित सोमवारी वर्षावर आढावा घेण्यात आली होती. नक्षलवादी परिसरात रखडलेल्या विकासकामांचाही कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला होता. नक्षलवादी कारवाया या ग्रामीण भागातून शहरी भागात वाढत असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट देखील घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्यानंतर या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील दिशा कशी असावी यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.


शेतकऱ्यांना ‘साले’ बोलणाऱ्या भाजपचं धोरण घराघरात पोहचवा, जयंत पाटलांचा हल्लाबोल