घरमहाराष्ट्रराज्यात २६ जानेवारीपासून 'शिवभोजन' मिळणार

राज्यात २६ जानेवारीपासून ‘शिवभोजन’ मिळणार

Subscribe

शिवसेनेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या १० रुपयांची थाळी म्हणजेच शिवभोजन योजनेला २६ जानेवारीपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या विशेष करुन शिवसेनेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या १० रुपयांची थाळी म्हणजेच शिवभोजन योजनेला २६ जानेवारीपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. तशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईसह राज्यात लवकरच १० रुपयांत जेवण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवभोजन योजनेसाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी वरील निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या योजनेकडे लागून राहिले आहे. राज्य सरकारकडे नुकतेच या योजनेचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात दिलेल्या आदेशामुळे लवकरच ही योजना सुरु होईल, यात शंका नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली सूचना

राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयानुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता १० रुपयांची थाळी मिळणारे एकूण १८ हजार इतके केंद्र उभारणार येण्यात येणार आहे. या योजनेसाठी तीन महिन्यांसाठी साधारण ६ कोटी ४८ लाख इतका अपेक्षित असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तर या निर्णयानुसार भोजनालय चालविण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असलेले खानावळ, एनजीओ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॅरंट अथवा मेस यापैकी ही योजना चालविण्यासाठी सक्षम असलेल्यांना यासाठी संधी दिल्या जाणार आहेत. वरील संस्थेची निवड करण्याकरिता महानगरपालिका, मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्र, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती यासाठी संस्थेची निवड करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तर या योजनेत देण्यात येणाऱ्या थाळीची किंमत शहरी भागात ५०, ग्रामीण भागांत ३५ इतकी राहणार असून यासाठी प्रतिग्राहकांकडून १० रुपये आकारण्यात येणार असून उर्वारित रक्कम अनुदानाच्या स्वरुपात देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – महाविकास आघाडीचा पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला अखेर ठरला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -