घर ताज्या घडामोडी महाविकास आघाडी सरकारचं काऊंटडाऊन सुरू, मुख्यमंत्री बरखास्तीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

महाविकास आघाडी सरकारचं काऊंटडाऊन सुरू, मुख्यमंत्री बरखास्तीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Subscribe

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असून दुसरीकडे भाजपकडून सागर बंगल्यावर सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर भाजपच्या नेत्यांनी अद्यापही चुप्पी साधलेली आहे. परंतु शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सरकार कोसळण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं काऊंटडाऊन सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अँटीजन टेस्ट त्यांची निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला हजर राहणार आहेत. थोड्याच वेळात सरकार बरखास्त होणार की वाचवणार, याबाबत उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे सर्व ४४ आमदार महाविकास आघाडीसोबत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर सत्तानाट्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नो कमेंट्स असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला वाचवण्यासाठी सर्वच पक्षाचे आमदार जोर लावत आहेत.

भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता?

एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये ४० आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपकडे १०६ आमदार आणि अपक्ष १३ असं मिळून १५९ आमदारांचं संख्याबळ असल्यामुळे भाजप पक्ष सरकार स्थापन करू शकतात.

- Advertisement -

सध्या शिवसेनेकडे १५ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ आमदार आहेत. काँग्रेसकडे ४४ आमदारांचं संख्याबळ आहे आणि अपक्ष १० असे एकूण १२२ आमदारांचं संख्याबळ सध्या महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे भाजप सरकारकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे महाविकास आघाडी कोसळून भाजप सरकार स्थापन होऊ शकतं, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनू शकतात.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे ते आज दुपारी मुंबईत दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ते आपल्या पाठिंब्याचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवणार आहेत.


हेही वाचा : संजय राऊत खुश! कारण… राऊतांच्या ट्विटनंतर नारायण राणेंचे खोचक ट्विट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -